Urine Symptoms : तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला अनेक लहान-मोठे त्रास जाणवतात. हा त्रास रोजच्या झाल्यामुळे त्याबाबत नवीन वाटत नसल्याने आपण टाळाटाळ करतो. मात्र काही समस्या गंभीर आजाराचे कारण असू शकतात. होय, तुमच्या लघवीचा रंग देखील एखाद्या गंभीराची लक्षणे असू शकतात. मात्र अनेकांना याची कल्पनाच नसते. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
किडनीचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजारांसाठी आहार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. किडनी निरोगी ठेवण्यासाठी वजन कमी करा. रक्तदाब आणि मधुमेहासाठी औषधे घ्या. मूत्रपिंडाचे फिल्टर खराब झाल्यास डायलिसिसची आवश्यकता असू शकते.
डिहायड्रेशन होणे, हाय स्ट्रेस, अत्यंत थंड तापमानात राहणे, उच्च तीव्रता शारीरिक क्रियाकलाप करणे, यासारख्या गोष्टी लघवीत प्रथिने आढण्यास जबाबदार ठरू शकतात.
लघवीतून फेस किंवा फोम तयार होतो. हात, पाय, ओटीपोट आणि चेहरा सुजणे, वारंवार श्वास लागणे, पोट खराब होणे किंवा उलट्या होणे, फक्त ही 5 लक्षणे खूप महत्वाची आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवावे आणि ही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.
लघुशंकेतून प्रथिने पडणे याचा थेट अर्थ असा आहे की ते हृदयरोगाशी जोडलेले आहेत. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की या चिन्हामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे असे काही आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा.
जेव्हा मूत्रपिंड खराब होते आणि योग्यरित्या कार्य करत नाहीत, तेव्हा लघुशंकेत प्रथिने तयार होऊ लागतात आणि ही प्रथिने लघवीद्वारे बाहेर पडतात. हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स किडनीच्या कमकुवत फिल्टरमधून बाहेर पडतात. याला अल्ब्युमिन्युरिया असेही म्हणतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)