फोटोत दिसणारी ही अभिनेत्री आता 50 वर्षांची झाली आहे. जिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तुम्ही ओळखलं का?
अभिनयासोबतच सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी फोटोमधील अभिनेत्री दिग्दर्शकाशी अफेअर आणि लग्नामुळे ट्रोल झाली होती.
फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता ती 50 वर्षांची झाली आहे.
खरं तर, ती दुसरी कोणी नसून उर्मिला मातोंडकर आहे. जिने बालदिनानिमित्त सोशल मीडियावर बालपणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
ज्यामध्ये तिने म्हटलं आहे की, आपल्यातील बालकाला आपण जिवंत ठेवले पाहिजे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीने या व्हिडीसोबत बालदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सोशल मीडियावर उर्मिला मातोंडकर नेहमी सक्रिय असते.
उर्मिला मातोंडकर यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 1977 मध्ये बालकलाकार म्हणून तिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.