उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळं ढगफुटी झाली आहे. उत्तरकाशी येथील खीरगंगा येथे ढगफुटी झाल्याने पुराचा फटका बसला. पण ही ढगफुटी कशी होते आणि ढगफुटी म्हणजे काय? जाणून घेऊयात.
खीरगंगा येथे झालेल्या ढगफुटीमुळं संपूर्ण गावच्या गाव उद्ध्व्स्त झाले आहे. अनेक स्थानिकांचा मृत्यू झालाय तर कित्येक जखमी झालेत. आता ढगफुटी म्हणजे काय जाणून घेऊयात.
किनारपट्टी भागात ढगफुटी विशेष होत नाही. उंच प्रदेशात व पहाडी भागात ढगफुटीची शक्यता जास्त असते. तसंच हा पाऊस अचानक होत असतो.
ढगफुटीदरम्यान 20 ते 30 चौरस किमी क्षेत्रामध्ये 100 मिमी किंवा 10 सेमी प्रति तासपेक्षा जास्त पाऊस पडतो. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने पुराची परिस्थिती उद्भवते.
ढगफुटीला कारणीभूत असणाऱ्या ढगांना कुमुलोनिम्बस असं म्हणतात. क्युम्युलस म्हणजे एकत्र होत जाणारे आणि निम्बस म्हणजे ढग. गरम हवा आणि आद्रता यामुळं ढगातील पाण्याचे प्रमाण वाढते.
पाण्याचे अब्जावधी थेंब या ढगांमध्ये असतात. जसेजसे तापमान वाढत जाते तसे कसे वातावरणात अधिक बाष्प निर्माण होते. या ढगांमध्ये हवेचा जोर वाढतो.
हवेचा जोर वाढल्याने तो ढगाना वर वर घेऊन जातो. ढगाच्या आतील मोठ्या थेंबानाही वर घेऊन जातो. जितक्या ताकदीने हवा थेंबाना वर घेऊन जाते. तितक्याच वेगाने खाली घेऊन येते.
पाण्याचे थेंब अतिशय वेगाने जमिनीकडे झेपावतात. या थेंबाचा वेग साधारणपणे 12 किमी असतो. तो अचानक 80 ते 90 किमीपर्यंत जाऊ शकतो.
लेहमध्ये 6 ऑगस्ट 2010 रोजी झालेली ढगफुटी ही आजपर्यंतची सर्वांत मोठी ढगफुटी मानली जाते. लेहमध्ये फक्त एका मिनिटांत 48.26 मिमी पाऊस पडला होता.