PHOTOS

वैभव सूर्यवंशी खरंच 14 वर्षांचा आहे का? वयात फेरफार केल्याचा होता आरोप, बोन टेस्टमधून समोर आलं सत्य

Vaibhav Suryavanshi IPL 2025 : वैभव सूर्यवंशी याने आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात केवळ 35 बॉलमध्ये शतक ठोकले. यासह आपल्या संघाला देखील विजय मिळवून दिला. केवळ 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी हा टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकणारा फलंदाज ठरला. मात्र वैभव सूर्यवंशी याच्या वयात फेरफार केल्याचे आरोप लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याच्या वडिलांनी याबाबत खुलासा केला होता. 

Advertisement
1/7

वैभव सूर्यवंशी याला आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी देऊन करारबद्ध केले. यासह त्याला राजस्थानने 19 एप्रिल रोजी झालेल्या लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात सुद्धा आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली. त्यामुळे 14 वर्षांचा वैभव हा आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 

2/7

वैभव सूर्यवंशीने सोमवारी गुजरात टायटन्स विरुद्ध सामन्यात राजस्थानला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 210 धावांची आवश्यकता असताना, 35 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या. या दरम्यान त्याने 11 षटकार आणि 7 चौकार ठोकले. या सह तो आयपीएल आणि  टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकणारा फलंदाज ठरला, यासह तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू सुद्धा ठरला. यापूर्वी हा रेकॉर्ड युसुफ पठाणच्या नावावर होता. 

3/7

वैभव आयपीएलपूर्वी 2024 मध्ये भारतीय संघाकडून आयसीसी अंडर 19 क्रिकेट आशिया कप सुद्धा खेळला. यादरम्यान त्याने 44 च्या सरासरीने 176  धावा केल्या होत्या. मात्र वैभवची ही कामगिरी माजी पाकिस्तानी खेळाडू जुनैद हजम याला खटकली आणि त्यांनी वैभवच्या वयात फेरफार करण्यात आल्याचा आरोप केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की 13 वर्षांच्या मुलात एवढी पॉवर असू शकते का? 

4/7

वैभवच्या वयात फेरफार करण्यात आल्याच्या आरोपांवर त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी उत्तर दिले होते. त्यांनी म्हटले की वैभव सूर्यवंशी 8 वर्षांचा असताना त्याची ऑफिशियल बोन टेस्ट झाली होती. त्यांनी सांगितले की ही टेस्ट बीसीसीआय द्वारे प्रमाणित होती. ही टेस्ट युवा खेळाडूंचा वयाची तपासणी करण्यासाठीच असते. 

 

5/7

वैभव सूर्यवंशीचे वडील संजीव यांनी सांगितले होते की, वैभव हा खरंच 14 वर्षांचाच आहे. वैभवचा जन्म हा 27 मार्च 2011 रोजी झाला होता. तो बिहारचा राहणार असून वयाच्या 5 व्या वर्षीपासून तो क्रिकेट खेळतोय. वैभव सूर्यवंशीच्या करिअरमध्ये त्याच्या आई वडिलांचं खूप मोठं योगदान आहे. 

6/7

लहान वयातच वैभव चांगलं क्रिकेट खेळू लागला त्यामुळे त्याला पुढील ट्रेनिंगसाठी समस्तीपुर, पटेल मैदानमध्ये ब्रिजेश झा यांच्या कॅम्पमध्ये पाठवण्यात आले. तेव्हा तो केवळ 7 वर्षांचा होता.  वैभव सूर्यवंशीने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुद्धा दमदार कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.  रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने दमदार खेळाचं प्रदर्शन केलं होतं. 

7/7

वैभव सूर्यवंशीचा या प्रवास वाटतो तितका सोपा झालेला नाही. आज आपण जे यश चाखत आहोत, त्यासाठी आपल्या आई-वडिलांनी फार संघर्ष केल्याचं त्याने  मुलाखतीत सांगितलं. आपल्या प्रॅक्टिस सेशनआधी आई सकाळी उठून डबा तयार करायची आणि वडिलांनी माझ्या गेमवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी नोकरी सोडलेली तसेच जमीन सुद्धा विकली असा खुलासा त्याने केला आहे. 





Read More