Vaishakh Amavasya 2023: येत्या 20 एप्रिलला गुरूवारी वैशाख अमावस्या आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या (Krishna Paksha) तिथीला अमावस्या असते. तेव्हा जाणून घेऊया कोणते उपाय केल्यावर तुम्हाला कोणत्या दोषांपासून मुक्ती (Vaishakh Amavasya Upay) मिळू शकते.
येत्या 20 एप्रिलला गुरूवारी वैशाख अमावस्या आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या असते.
यावेळी तुम्ही खास उपाय करू शकता ज्यातून तुम्हाला त्या दोषांमधून सुटका मिळू शकते.
यावेळी वैशाष अमावस्येला सुर्यग्रहण आहे. त्यामुळे तुम्हीही हे उपाय फॉलो कराल तर तुम्हाला या तीन महादोषांपासून सुटका मिळू शकते.
साडेसातीपासून मुक्तता हवी असेल तर शनि देवाची पूजा करावी. पितृ दोषापासून सुटका हवी असेल तर पितृंना पाण्यानं तर्पण किंवा पिंडदान करा. कालसर्प दोषांतून मुक्तता हवी असेल तर तुम्ही नाग देवताची पूजा करावी.
ज्योतिषशास्त्रानुसार, वैशाख अमावस्या तिथी 19 एप्रिलला सकाळी 11 वाजून 23 मिनिटांपासून सुरू होत 20 एप्रिलला सकाळी 9 वाजून 41 मिनिटांपर्यंत आहे. 20 तारखेला सुर्योदय होताच वैशाख अमावस्या समाप्त होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपय जाणकारांचा सल्ला घ्या.)