Vaishnavi Hagawane Death Case New Photos: हगवणे कुटुंबाने लाखो रुपयांचा हुंडा घेतल्यानंतरही त्यांची हाव कायम होती. वैष्णवीच्या माहेरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून त्यामधून हेच स्पष्ट होतंय. नेमकं काय आहे या फोटोंमध्ये पाहूयात...
वैष्णवी हगवणेच्या माहेरच्या घरातील व्हिडीओ आणि फोटो समोर आले असून यामध्ये कशाप्रकारे हगवणे कुटुंबाचा बडदास्त राखण्यात आलेली हे दिसून येत आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांनी पाहुणाचर करताना हगवणे कुटुंबाला काय काय भेटवस्तू दिलेल्या पाहूयात...
पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणांमध्ये आणखी काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
या फोटो आणि व्हिडीओमध्ये वैष्णवीच्या आई वडिलांकडून हगवणे कुटुंबाला महागड्या भेटवस्तू दिल्या जात असल्याचं दिसत आहे.
वैष्णवीच्या पालकांनी तिच्या आत्महत्येनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हगवणे कुटुंबाला आम्ही चांदीच्या गौरी करुन दिल्या होत्या असं सांगितलेलं. त्याचा फोटो सुद्धा समोर आला आहे.
हगवणे कुटुंबाला वैष्णवीच्या आई-वडिलांनी चांदीच्या गोरी करुन दिल्या. वैष्णवीची आईच या गौरी हगवणेंच्या घरी घेऊन गेलेल्या.
वैष्णवीच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या विशेष स्नेह भोजनाला हगवणे कुटुंबाने हजेरी लावलेली.
यावेळी वैष्णवीच्या आई-वडिलांनी जावयाला आणि लेकीला महागड्या भेटवस्तू दिलेल्या.
या भेटवस्तूंमध्ये कपड्यांबरोबरच सोन्या-चांदीच्या दागिन्यांचाही समावेश असल्याचं स्पष्ट होतं.
वैष्णवीच्या सासू-सासऱ्यांनाही तिच्या कुटुंबियांनी खास भेटवस्तू दिल्याचं व्हिडीओत दिसत आहे.