PHOTOS

वंदे भारतमधून प्रवास अधिक आरामदायी होणार, ग्राहकांच्या तक्रारीनंतर नवीन Vande Bharat सेवेत

Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 9 वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन करणार आहेत. या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखाचा व सुकर होईल. नवीन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. यात प्रवाशांच्या छोट्या-मोठ्या गरजाही विचारात घेतल्या आहेत. 

Advertisement
1/8
वंदे भारतमधून प्रवास अधिक आरामदायी होणार, ग्राहकांच्या तक्रारीनंतर नवीन Vande Bharat सेवेत
वंदे भारतमधून प्रवास अधिक आरामदायी होणार, ग्राहकांच्या तक्रारीनंतर नवीन Vande Bharat सेवेत

वंदे भारत ट्रेन ही भारतातील सर्वात सुपरफास्ट एक्स्प्रेस आहे. आरामदायी प्रवास आणि अत्याधुनिक सुविधा या ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी काही तक्रारी केल्या होत्या. या तक्रारी लक्षात घेऊन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. 

2/8
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस

प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर ट्रेनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, नवीन वंदे भारत ट्रेनमध्ये 19.37 डिग्रीपर्यंत सीट झुकते. सीटमध्ये लावण्यात आलेल्या उशा अधिक जाड करण्यात आला आहे. 

3/8
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस

सीटमध्ये करण्यात आलेल्या बदलानंतर एक्झिकिट्युव्ह श्रेणीतील सीटचा लाल रंग बदलून निळ्या रंगाचा करण्यात आला आहे. अनेकदा प्रवाशांनी यावरुन तक्रार केली होती. 

4/8
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस

नवीन वंदे भारत ट्रेनमध्ये एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील सगळ्यात शेवटच्या सीटवर पाय ठेवण्यासाठीही थोडी जागा देण्यात आली आहे.

5/8
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस

नवीन वंदे भारत ट्रेनमध्ये मोबाइल चार्जर पॉइंट अधिक सोयीचे होण्यासाठी सीटच्या खालच्या बाजुने देण्यात आले आहेत. 

6/8
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस

नवीन वंदे भारत ट्रेनमध्ये टॉयलेटमध्ये असलेल्या बेसिन अधिक खोल करण्यात आली आहे. जेणेकरुन हात धुताना पाणी बाहेर येणार नाही. त्याचबरोबर शौचालयातील हँडल आणि नळातही अनेक बदल करण्यात आले आहेत. 

7/8
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस

नवीन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये शौचालयात चांगला प्रकाश मिळावा यासाठी 1.5 वॉटचा बल्ब बदलून 2.5 वॉटचा बल्ब लावण्यात आला आहे. 

8/8
नवीन वंदे भारत
नवीन वंदे भारत

नवीन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी व्हील चेअरसाठी सुरक्षित जागेची तरतूद समाविष्ट आहे. याशिवाय पूर्वीपेक्षा चांगले फायर सेन्सर बसवण्यात आले आहेत.





Read More