Entertainment : बॉलिवूडमध्ये येण्याचं असंख्य लोकांचं स्वप्न असतं. पण त्यासाठी अनेक कठीण संघर्षातून जावं लागतं. चित्रपटसृष्टीशी संबंध असला तरी इथे दम बसवणं सोपं नसतं.
फोटोमधील चिमुकल्याने आपल्या मेहनत आणि अभिनयाने एकावर एक सुपरहिट चित्रपट दिले. त्याला इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला फार वेळ लागला नाही.
चाहत्यांना त्यांच्या अभिनयातून गोविंदाची छबी दिसत होती. आज या अभिनेत्याचा वाढदिवस असून तो लवकरच बाबा होणार आहे.
आम्ही बोलत आहोत डेव्हिडी धनव यांच्या मुलगा वरुण धवनबद्दल. वडिलांनी होम प्रोडक्शनमधून अरुणला लॉन्च करण्यास नकार दिला. त्यानंतर वरुणने मेहनतीने करण जोहरचा स्टुडंट ऑफ द इयरमध्ये संधी मिळाली. पहिल्याच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.
वरुणचं शिक्षण नॉटिंगहॅम विद्यापीठातून झालं. तो शिकत असताना लंडनच्या नाईट क्लबमध्ये पार्ट टाइम दारु विकायचा.
'स्टुडंट ऑफ द इयर' मध्ये अभिनय करण्यापूर्वी त्याने शाहरुख खानचा माय नेम इज खान या चित्रपटासाठी करण जोहरासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले.
वरुण खऱ्या आयुष्यात वयाच्या 10 वर्षीच हिरो झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार एकदा वरुणच्या शेजारी राहणाऱ्या महिलेची किंचाळण्याचा आवाज त्याला आला. त्याने लगचेच 100 नंबर डायल केला आणि पोलिसांना बोलवलं.
वरुणला लहानपणापासूनच अभिनय करायचा होता. वरुणने बालपणीची मैत्रीण नताशा दलालशी लग्न केलं. काही दिवसांपूर्वी नताशाचं बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.