प्राजक्ताचे झाड आणि झाडाखाली फुलांचा पडलेला सडा हे दृष्य किती सुंदर दिसते ना. अनेकांच्या घराशेजारी किंवा अंगणात प्राजक्ताचे झाड असते. वास्तुशास्त्रात व ज्योतिषशास्त्रात प्राजक्ताच्या झाडांबद्दल अनेक बाबी सांगितल्या आहेत.
वास्तुशास्त्रात प्राजक्ताचे झाड घरासमोर लावावे की नाही? याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. आज आपण जाणून घेऊयात या झाडाचे फायदे आणि पौराणिक कथा.
प्राजक्ताच्या झाडाची फुलं खूपच सुंदर दिसतात. केसरी देढ आणि पांढरे फुल दिसायला खूपच सुंदर दिसतात. प्राजक्ताच्या झाडामागे एक अख्यायिका सांगितली जाते.
असं म्हणतात, प्राजक्ताचे झाड कृष्णाने स्वर्गाहून पृथ्वीवर आणले असं मानलं जातं. पण हे झाड कुठे लावावे यासाठी सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाले.कृष्णाने शक्कल लढवली अन् हे झाड सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की त्याची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडतील.
घरात प्राजक्ताचे झाड असणे खूप शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीला प्राजक्ताचे फुल अत्यंत प्रिय असते. जिथे प्राजक्ताची फुल फुलतात तिथे देवी लक्ष्मी वास करते, अशी मान्यता आहे.
प्राजक्ताच्या फुलांचा सुवास मनमोहक असतो त्यामुळं घरात किंवा दारासमोर प्राजक्ताचे झाड असल्यास या सुवासाने आपोआप तणाव दूर होतो. त्यामुळं, मनाला शांतीदेखील मिळते.
घराच्या आजूबाजूला प्राजक्ताचे झाड असते त्यांच्या घरातील वास्तुदेष दूर होतात. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहते.
घरामध्ये पारिजात रोप लावण्यासाठी वास्तुशास्त्रात दिशा सांगितली आहे. नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी आणि घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी घरात प्राजक्ताचे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)