Vastu Tips : अनेकजण ज्योतिष शास्त्रानुसार मनी प्लांट लावतात. तर काहीजण घर सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या वृक्षांनी सजावट करत असतात. खरं म्हटलं तर झाडे घरातील वातावरण शुद्ध करतात. पण घरात लहान आणि अतिशय सुंदर दिसणारे स्पायडर प्लांट घरात लावल्याने कोणते फायदे होतात... ते जाणून घ्या..
वास्तुशास्त्रानुसार स्पायडर प्लांट हे घराची उत्तर, पूर्व, ईशान्य किंवा उत्तर-पश्चिम दिशेला हे रोपटं ठेवणे सर्वोतम शुभ मानले जाते. घरामध्ये रोपे लावण्यासाठी या दिशा उत्तम आणि चांगल्या मानल्या जातात..
तुम्ही जर हा प्लांट तुमच्या ऑफीस किंवा बिझनेसच्या ठिकाणी ठेवायचा असेल तर तुमच्या कामाच्या ठिकाणी डेस्कवर ठेवू शकता.
घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी स्पायडर प्लांट घरात योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घराच्या दिवाणखान्यात, स्वयंपाकघरात, बाल्कनीत किंवा व्यायामाच्या खोलीत रोपे ठेवू शकता.
घरामध्ये स्पायडर प्लांट ठेवल्यास त्याला सुकू देऊ नका, जर ते रोप सुकले किंवा इतर कोणत्याही समस्येमुळे मरून गेले तर स्पायडर प्लांट काढून टाका आणि लगेच नवीन रोप लावा असे वास्तुशास्त्राने सांगितले आहे.
याशिवाय घराच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला स्पायडर प्लांट ठेवल्यास अशुभ परिणाम मिळू शकतात. म्हणूनच झाडे त्या दिशेने ठेवू नयेत.