PHOTOS

Vastu Tips : 'या' 8 सवयींमुळे घरात येतं दारिद्र्य ! तुम्हाला तर नाही 'ही' सवय?

Vastu Tips : घरातील वडीलधारी मंडळी लहानपणापासून आपल्याला चांगल्या सवयी लावतात. पण बाहेरील प्रभावाने अनेकांना वाईट सवयी लागतात. तुमची ही घरात नकारात्मक आणि गरिबी घेऊन येते. त्या कुठल्या सवयी आहेत जाणून घ्या. 

Advertisement
1/8

आजकाल अनेक लोक बिछान्यावर बसून काम करतात अगदी टीव्ही पाहत जेवतात. तुमची ही सवय लक्ष्मी मातेला नाराज करण्याच कारण ठरते. यामुळे घरात नकारात्मक वातावरण येतं. 

2/8

घरात कामवाली मावशी आली नाही तर घर अस्वच्छ राहतं. घराची साफसफाई होत नाही, अशावेळी अस्वच्छ घरात माता लक्ष्मी वास करत नाही. 

 

3/8

अनेक जण सूर्य उगवल्यानंतरही बराच वेळ झोपून राहतात त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण तयार होतं. घरात सुख समृद्धी नांदत नाही असं म्हणतात. 

 

 

4/8

एखाद्या व्यक्तीला पैस परत करायचे असेल किंवा पैसे कर्ज म्हणून पण द्यायचे असेल तर सूर्यास्तानंतर देऊ नका. अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची भीती असते. 

 

 

5/8

रात्रीचे स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. नाही तर अन्नपूर्णा माता नाराज होते. घरातील संपत्ती कमी होते. 

 

6/8

तुम्हाला नखं खाण्याची किंवा चावण्याची सवय असेल तर सूर्य कमजोर होतो आणि तुम्हाला बदनामीचा त्रास सहन करावा लागू शकतो. 

 

7/8

रात्री घर झाडणं वास्तुनुसार चुकीचं असतं. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते असं म्हणतात. 

 

8/8

जर तुमच्या घरात शूज आणि चप्पल विखुरलेल्या राहिल्या तर त्यामुळे अनावश्यक ताण वाढतो. संपत्तीत घट होऊन यश मिळविण्यात अडथळे निर्माण होतात. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)  





Read More