Vasubaras Wishes 2023 : ''दिन दिन दिवाळी गायी – म्हशी ओवाळी गायी – म्हशी कुणाच्या गायी – म्हशी माझ्या मामाच्या'' लहानपणी म्हणारं हे गाणं तुम्हाला आठवतं. दिवाळीची पहिली पणती गुरुवारी 9 नोव्हेंबरला गाय वासरांसाठी लावली जाणार आहे. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. या सणाचा आनंद द्विगुणी करण्यासाठी खास मराठीतून आपल्या प्रियजनांना सोशल मीडियावरुन शुभेच्छा द्या.
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा!
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा ! आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी, दुध-दुभत्याची सदा व्हावी वृद्धी,
व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी,
गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी !
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त,
आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला, स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..
परमपुज्य जी वंद्य या भारताला,
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा..!
दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा, गाय अन वासराच्या वात्सल्याचा…!
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.
गाय आणि वासराची पूजा करून
त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.
वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा.
गाय आणि वासराच्या अंगी
असणारी उदारता, प्रसन्नता,
शांतता आणि
समृद्धी आपणास लाभो.
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
पशु हे धन मानून गाय व वासराच्या नात्यातील निखळता, कृतज्ञता, शुद्धता हे गुण स्मरण्याचा दिन
वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी.
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!