Padma Shri Ashok Saraf Total Property: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश असून त्यांना मानाचा 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर जाऊन घेऊयात त्यांच्या एकूण संपत्तीसंदर्भात...
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मागील वर्षी महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला. तर यंदा त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांची आणि त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती किती आहे हा जाणून घेऊयात...
मराठी, हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारे आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना भारत सरकारकडून जाहीर होणारा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे.
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये चौथा सर्वोच्च पुरस्कार असलेला 'पद्मश्री' अशोक सराफ यांना जाहीर होत असल्याची घोषणा 2025 च्या प्राजसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली.
विशेष म्हणजे 2024 साली राज्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत होतं त्यावेळेस अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला. त्यानंतर वर्षभराताच अशोक सराफ यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे.
'पद्मश्री' पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक सराफ यांच्यावर सर्वच स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर भूमिकांपासून ते अगदी खलनायकही अशोक सराफ यांनी साकारल्याचं पाहायला मिळालं आहे.
आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीच नाही तर हिंदी रसिकांच्या मानवरही अधिराज्य गाजवणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
80 आणि 90 च्या दशकात मराठी सिनेसृष्टीत सर्वात चर्चेत असलेल्या अभिनेत्यांमध्ये अशोक सराफांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं.
अशोक सराफ यांनी भूमिका साकारलेले अनेक सिनेमा, त्यांनी पडद्यावर उभी केलेली धनंजय मानेसारखी अनेक पात्रं अजरामर आहेत यात तिळमात्र शंका नाही
अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच त्यांच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे. अशोक सराफ यांची एकूण संपत्ती किती आहे, याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे.
तर 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या अशोक सराफ यांची एकूण संपत्ती 37 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं वृत्त वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाबरोबरच जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई केली आहे.
अभिनेत्री आणि अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता जोशी- सराफ यांची एकूण संपत्ती जवळपास 10 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
नाटक, सिनेमे, मालिका आणि जाहिराती अशा मनोरंजन सृष्टीमधील वेगवेगळ्या माध्यमांतून निवेदिता सराफ यांनी कष्टाने ही संपत्ती कमवली आहे.