मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतलं विक्रम गोखले हे मोठं नावं होतं. मराठी,हिंदी सिनेमा, मालिकांसह रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
विक्रम गोखले यांनी फक्त मराठीच नाही हिंदी कलाविश्वात देखील मोलाची कामगिरी केली. 'आधारस्तंभ', 'माहेरची साडी', 'नटसम्राट', 'प्रवास', 'हम दिल दे चुके सनम' अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली.
विक्रम गोखले यांच्या अकाली एक्झिटमुळे चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. शनिवारी सायंकारी 4 वाजण्याच्या सुमारास गोखले याचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे.
अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनदेखील केलं आहे. गोखले यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' या सिनेमाचं समीक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. 'गोदावरी' हा मराठी सिनेमा विक्रम गोखले यांचा अखेरचा सिनेमा ठरला.
गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्ण्यालयात उपचार सुरु होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असण्याविषयी त्यांच्या कुटूंबियांनी आणि डॉक्टरांनी माहिती दिली होती.