1000 CC Bullet Bike: कारबेरी मोटरसायकलने ही बाईक तयार केली आहे. पॉल कारबेरी यांनी या कंपनीची स्थापना केली होती. 2016 मध्ये कंपनीने भारतात निर्मिती सुरु केली. ही कंपनी रॉयल एनफिल्डच्या बाईकला कस्टमाइज करते.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दणकट इंजिन असणारी दमदार रॉयल एनफिल्ड बुलेट दिसत आहे.
ही कस्टम बिल्ट 1 लीटर क्लॉस बुलेट आहे. हिचं नाव कारबेरी डबल बॅरल 1000 आहे. हिचं इजिन फार पॉवरफूल आहे.
कारबेरी मोटरसायकलने ही बाईक तयार केली आहे. पॉल कारबेरी यांनी या कंपनीची स्थापना केली होती. 2016 मध्ये कंपनीने भारतात निर्मिती सुरु केली. ही कंपनी रॉयल एनफिल्डच्या बाईकला कस्टमाइज करते.
या बाईकमध्ये 1000 सीसी क्षमतेच्या V-ट्वीन इंजिनचा वापर करण्यात आला आहे. रॉयल एनफिल्डकडून सोर्स करण्यात आलेल्या 500 सीसीच्या 2 इंजिनला जोडून हे इंजिन तयार करण्यात आलं आहे.
हे इंजिन 53.7HP ची पॉवर आणि 82Nm चा टॉर्क जनरेट करते. पॉवर आऊटपूटमध्ये ही बाईक ऑल्टो 800 पेक्षाही जास्त दमदार आहे, जिचं इंजिन 48Hp ची पॉवर जनरेट करते.
या इंजिनला 5 स्पीड गेअरबॉक्स आणि 7 प्लेट क्लचने जोडण्यात आलं आहे. डिझाईनमध्ये ही बाईक रॉयल एनफिल्डच्या क्लॉसिक लूकप्रमाणे आहे.
आकाराबद्दल बोलायचं गेल्यास ही बाईक 2290 मिमी लांब, 1100 मिमी उंच आहे. यामध्ये 1550 मिमी लांबीचा व्हीलबेस मिळतो.