बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची गर्लफ्रेंडबाबत विद्या बालनने केला मोठा खुलासा. जाणून घ्या सविस्तर
कार्तिक आर्यन आणि विद्या बालन त्यांच्या 'भूल भुलैया 3' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत.
दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशनदरम्यान विद्या बालनने कार्तिकबद्दल मोठा खुलासा केला आहे.
'द कपिल शर्मा शो'च्या आगामी एपिसोडमध्ये विद्या बालन आणि कार्तिक आर्यन दिसणार आहेत.
नुकताच या एपिसोडचा टीझर समोर आला आहे. ज्यामध्ये विद्या बालनने कार्तिक कुणाला तरी डेट करत असल्याचं म्हटलं आहे.
कारण 'भूल भुलैया 3' चित्रपटाच्या शूटिंगच्या ब्रेक टाईममध्ये कार्तिक आर्यन फोनवर व्यस्त असायचा.
या प्रमोशनदरम्यान विद्या बालन-कार्तिक आर्यनसोबत तृप्ती डिमरी देखील दिसणार आहे.
कार्तिक आर्यन 'भूल भुलैया 3' या चित्रपटात पुन्हा एकदा रुह बाबाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.