PHOTOS

Dahi Handi 2024: विहिरीवरच्या दहीहंडींचा थरार, महाराष्ट्रात कुठे आणि कशी साजरी केली जाते 'ही' दहीहंडी

Dahi Handi 2024 : जन्माष्टमीनंतर आता सगळीकडे गोविंदांच्या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील एका गावात आगळावेगळा गोपाळकाला साजरा केला जातो. 'विहिरीवरची दहीहंडी' म्हणून हा गोपाळकाला जगभरात लोकप्रिय आहे. 

Advertisement
1/7
कशी साजरी होती विहिरीवरची दहीहंडी?
कशी साजरी होती विहिरीवरची दहीहंडी?

दहीहंडी विहिरीच्या मध्यभागी लावली जाते. विहिरीच्या कठड्यावरून थर रचून दहीहंडी फोडली जाते. ही हंडी फोडण्यासाठी तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो. 40 फूट खोल विहिरीवर ही दहीहंडी बांधली जाते. 

2/7
कुठे साजरी केली जाते?
कुठे साजरी केली जाते?

अलिबाग तालुक्यातील कुर्डूस या गावाने गेल्या काही वर्षांपासून विहिरीच्या मध्यभागी दहीहंडी बांधण्याची अनोखी परंपरा जपली जात आहे.  या दहीहंडीमंध्ये तरुणांसोबतच गावकरी मंडळींचा उत्साह वाखाण्याजोगा असतो. 

3/7
अशी होती परंपरा
अशी होती परंपरा

पहिली काही वर्षे देऊळ आळीतील विहिरीवर तसेच बाजूला असलेल्‍या सीताफळाच्या झाडाचा आधार घेत दहीहंडी फोडण्याचे प्रयत्न झाले. पण आता ही दहीहंडी विहिरीच्या मध्यभागी लावली जाते. विहिरीच्या कठड्यावरून थर रचून दहीहंडी फोडली जाते. ही हंडी फोडण्यासाठी तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो.

4/7
शांत वातावरणात
शांत वातावरणात

अलिबागमधील ही आगळी वेगळी दहीहंडी गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच धामधुमीपासून दूर आहे. अतिशय शांत आणि फक्त गावातील गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. महत्त्वाचं म्हणजे फक्त याच भागात विहिरीच्या मध्यभागी हंडी लावून फोडण्याची परंपरा आहे. 

5/7
कधीपासून सुरु आहे ही परंपरा
कधीपासून सुरु आहे ही परंपरा

या गावातील धाडसी तरुण, ज्येष्ठ शेतकरी लोकांनी एकत्र येऊन 1992 सालापासून ही परंपरा सुरु केली. विहिरीवरील दहीहंडीची कल्पना यांना सुचली. सुरुवातीला ही दहीहंडी देऊळ आळीतील विहिरीवर तसेच बाजूला असलेल्या सीताफळाच्या झाडाच्या मदतीने मध्यभागी बांधली जात असे. 

6/7
आताचं स्वरुप
आताचं स्वरुप

विहिरीवरच्या दहीहंडीचं स्वरुप आता थोडं बदललं आहे. कुर्डुस गावातील देऊळ आळी येथे मुबलक प्रमाणात पाणी असलेल्या विहिरीच्या मध्यभागी ही दहीहंडी लावली जाते. विहिरीच्या कठड्यावर दोन ते तीन तरुण उभे राहतात. या तीन चार तरुणांच्या हातावर किंवा खांद्यावर एक तरुण उभा राहतो. त्या तरुणाला तीन संधी मिळते. तरुणाने दहीहंडीला स्पर्श केल्यास ती दहीहंडी खाली करुन फोडली जाते. ही विहिरीतील दहीहंडी गेल्या 30 वर्षांपासून लोकप्रिय आहे. 

7/7
दुखापतीची काळजी नाही
दुखापतीची काळजी नाही

विहिरीवरील दहीहंडीमुळे इतर दहीहंडीमध्ये होणाऱ्या दुखापतींची जोखीम अतिशय कमी आहे. कुर्डुस गावचे ग्रामस्थ सांगतात की, अद्याप विहिरीवरील दहीहंडीमुळे कुणालाही दुखापत झालेली नाही. 

 





Read More