PHOTOS

कधीकाळी 72000000000 चा मालक, मित्राच्या बायकोवर जडला जीव; गर्लफ्रेण्ड्सवर उडवले पैसे, फ्लर्टमॅन माल्याच्या Love Stories!

  आजची माहिची विजय माल्ल्याच्या व्यवसायाबद्दल आणि कर्जाबद्दल नाही तर त्याच्या लव्ह लाइफबद्दल आहे.

Advertisement
1/13
कधीकाळी 72000000000 चा मालक, मित्राच्या बायकोवर जडला जीव; गर्लफ्रेण्ड्सवर उडवले पैसे, फ्लर्टमॅन माल्याच्या Love Stories!
कधीकाळी 72000000000 चा मालक, मित्राच्या बायकोवर जडला जीव; गर्लफ्रेण्ड्सवर उडवले पैसे, फ्लर्टमॅन माल्याच्या Love Stories!

Vijay Mallya Love Life: भारतीय बँकांमधून कोट्यवधी रुपये घेऊन भारतातून पळून गेलेला फरार उद्योगपती विजय मल्ल्या सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. भारतीय बँकांनी त्यांच्याकडून 14,131.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली आहे. तर त्यावर 6,203 कोटी रुपयांचे दायित्व होते, असा दावा विजय मल्ल्याने केलाय. विजय मल्ल्या त्याचे कर्ज फेडणार असल्याचा दावा करतोय. भारतीय बँकांनी ब्रिटनमध्ये मल्ल्याविरुद्ध दिवाळखोरीचा आदेश कायम ठेवण्यासाठी खटला जिंकलाय. किंगफिशर एअरलाइन्सवरील थकीत कर्जाची परतफेड करण्याची मागणी भारतीय बँका करतायत. बँका आणि मल्ल्या यांच्यात वाद सुरू आहे, पण आज चर्चा त्याच्या व्यवसायाबद्दल आणि कर्जाबद्दल नाही तर त्याच्या लव्ह लाइफबद्दल आहे.

2/13
विजय मल्ल्याची 3 लग्न
विजय मल्ल्याची 3 लग्न

विजय मल्ल्या त्याच्या रंगीबेरंगी आणि आलिशान जीवनशैलीमुळे अनेकदा चर्चेत असतो. भारतीय बँकांमधून हजारो कोटी रुपये घेऊन पळून गेलेल्या विजय मल्ल्याने 3 लग्ने केली. कधीकधी तो फ्लाइटमध्ये एअर होस्टेसच्या प्रेमात पडला तर कधीकधी त्याचा मित्राच्या पत्नीवर जीव जडला. प्रेमाचा हा प्रवास वयाच्या 62 व्या वर्षापर्यंत चालू राहिला. स्वतःपेक्षा 30 वर्षांनी लहान असलेल्या महिला कर्मचाऱ्यांवर प्रेम करणारा विजय मल्ल्या लंडनमध्ये आलिशान जीवन जगतोय. अलिकडेच त्याचा एकुलता एक मुलगा सिद्धार्थ मल्ल्या याचेही लग्न झाले.

3/13
सिद्धार्थ हा समीरा आणि विजय यांचा मुलगा
 सिद्धार्थ हा समीरा आणि विजय यांचा मुलगा

विजय मल्ल्याचा जन्म कोलकाता येथे झाला. त्याचे वडील विठ्ठल मल्ल्या हे देशातील एक प्रसिद्ध उद्योगपती होते. लहानपणापासूनच त्याने पैसा, सुखसोयी आणि आलिशान घरे पाहिली आहेत. विलासी जीवन जगणाऱ्या विजय मल्ल्याचे पहिले लग्न एका एअर होस्टेसशी झाले होते.  1986 मध्ये व्यवसायासाठी अमेरिकेला जाणारा मल्ल्या एअर इंडियाच्या फ्लाइट अटेंडंट समीरा तैयबजीला भेटला. समीराला पाहताच विजय मल्ल्याचे हृदय हरपले. भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला आणि दोघांनी लग्न केले. सिद्धार्थ हा समीरा आणि विजय यांचा मुलगा आहे.

4/13
लग्नाच्या एका वर्षानंतर घटस्फोट
 लग्नाच्या एका वर्षानंतर घटस्फोट

मुलाच्या जन्मानंतर मल्ल्या आणि समीरा यांच्यातील अंतर वाढू लागले. फक्त दीड वर्ष टिकलेल्या लग्नानंतर दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि वेगळे झाले. त्या जोडप्यात दुरावा निर्माण होऊ लागला. त्यांच्यात तणाव निर्माण होऊ लागला; त्यांच्यात भांडणे, वेगवेगळी मते आणि वाद वाढत होते. लग्नाच्या एका वर्षानंतर 1987 मध्ये दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेतला.

5/13
मित्राच्या पत्नीवर प्रेम
मित्राच्या पत्नीवर प्रेम

समीरासोबतचे लग्न तुटल्यानंतर काही वर्षांनीच माल्याच्या आयुष्यात आणखी एक महिला आली. तो त्याच्या शेजारी आणि मित्राची पत्नी रेखा हिच्याशी जवळीक साधू लागला. रेखाने आधीच दोनदा लग्न केले होते. रेखाही केवळ मल्ल्याच्या शेजारी आणि मित्राची पत्नी नव्हती तर त्याची बालपणीची मैत्रीणदेखील होती. जवळीक वाढत गेल्याने दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. रेखासोबतच मल्ल्यानेही तिची मुलगी लैला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. मल्ल्यासोबत लग्नानंतर तिला लीना आणि तान्या नावाच्या आणखी दोन मुली झाल्या. रेखा या दोन्ही मुलींसोबत तिच्या कॅलिफोर्नियातील घरात राहते.

6/13
2016 मध्ये डेटींगला सुरुवात
2016 मध्ये डेटींगला सुरुवात

त्याच्या दुसऱ्या लग्नात घटस्फोट झाल्याचे वृत्त नसले तरी तो अनेकदा तिसऱ्या महिलेसोबत दिसला. 2018 मध्ये, त्याच्यासोबत एक महिला वारंवार दिसू लागली. नाव पिंकी लालवानी आहे. 2011 मध्ये पिंकी किंगफिशर एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस होती.  विजय मल्ल्यानेच त्यांना हे काम दिले होते.  दोघांनीही 2016 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

7/13
पिंकी लालवानी मल्ल्यापेक्षा 30 वर्षांनी लहान
पिंकी लालवानी मल्ल्यापेक्षा 30 वर्षांनी लहान

पिंकी लालवानी ही मल्ल्यापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. ती मल्ल्यासोबत त्याच्या लंडनमधील घरात राहते.  पिंकीने किंगफिशर कॅलेंडरसाठी फोटोशूटही केले. 2016 मध्ये जेव्हा मल्ल्या देश सोडून पळून गेला, तेव्हा पिंकी लालवानी देखील त्याच्यासोबत लंडनला गेली होती.

8/13
पिंकी लालवानीशी नातं
पिंकी लालवानीशी नातं

न्यायालयीन सुनावणीदरम्यान पिंकी लालवानी अनेकदा मल्ल्यासोबत दिसते. विजय मल्ल्याने लंडनच्या न्यायालयात आपल्या आर्थिक स्थितीबद्दल स्पष्टीकरण देताना असेही म्हटले की, 'माझी मालमत्ता आणि बँक खाती गोठवण्यात आली आहेत. मला पिंकी लालवानीकडून मोठे कर्ज घेऊन जगावे लागते.' काही माध्यमांच्या वृत्तांत असाही दावा करण्यात आला होता की, पिंकी आणि मल्ल्या यांचे लग्न झाले. काहींनी ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला. असेही म्हटले जात आहे की त्याचा दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट झाला नसल्यामुळे तो पिंकी लालवानीशी लग्न करू शकत नव्हता पण दोघेही जोडीदारासारखे राहतात.

9/13
सिद्धार्थ मॉडेल आणि अभिनेता
सिद्धार्थ  मॉडेल आणि अभिनेता

विजयचा मुलगा सिद्धार्थ त्याच्या वडिलांसोबत व्यवसाय सांभाळतो.  लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवीधर असलेला सिद्धार्थ मल्ल्या मानसिक आरोग्यावर काम करतो. त्याच्या अनेक बॉलिवूड सुंदरींसोबतच्या अफेअरच्या अफवा होत्या, पण आता त्याने त्याच्या  प्रेयसीशी लग्न केले आहे. तो मॉडेल आणि अभिनेता म्हणून काम करतो.  अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्ये काम करणारा सिद्धार्थ सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. ऑनलाइन व्हिडिओ शो होस्ट करणाऱ्या सिद्धार्थने गिनीजसाठी मार्केटिंग मॅनेजर म्हणूनही काम केले आहे. सिद्धार्थने त्याच्या वडिलांना व्यवसायात मदत केली असली तरी त्याला त्यात फारसा रस नव्हता. तो आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्रमुख म्हणून काम करत होता.

10/13
ब्रिटिश न्यायालयात खटला
 ब्रिटिश न्यायालयात खटला

भारतीय बँकांमधून 10 हजार कोटी रुपये घेऊन विजय मल्ल्या मार्च 2016 मध्ये देश सोडून पळून गेला. त्याच्यावर 17 बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बँकांनी त्यांच्या कंपनी किंगफिशरला कोट्यवधी रुपये कर्ज म्हणून दिले, पण 2012 च्या अखेरीस ही कर्जे अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) म्हणून घोषित करण्यात आली. 2019 मध्ये कर्ज बुडवण्याच्या आणि बँक फसवणुकीच्या प्रकरणात विजय मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार ब्रिटिश न्यायालयात खटला लढतंय.

11/13
सिद्धार्थ मल्ल्या करिअर
सिद्धार्थ मल्ल्या करिअर

2019 मध्ये डेक्कन क्रॉनिकल या इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ मल्ल्या अनेक वर्षांपासून नैराश्याने ग्रस्त होता. यानंतर त्याने मानसिक आरोग्यावर काम करण्यास सुरुवात केली. त्याने मानसिक आरोग्यावर इफ आय एम ऑनेस्ट: अ मेमोयर ऑफ माय मेंटल हेल्थ जर्नी आणि सॅड-ग्लॅड ही 2 पुस्तके लिहिली आहेत.  विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ देखील मार्गदर्शकांच्या आरोग्यावर अनेक कार्यक्रम करतो. त्याच्या इंस्टाग्राम पेजवर, त्याने मानसिक आरोग्य आणि नैराश्यावर अनेक व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. सिद्धार्थ  स्वतः नैराश्याचा बळी होता. तो लोकांना त्याबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या वडिलांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा वारस सिद्धार्थ मल्ल्या अभिनय आणि मॉडेलिंग व्यतिरिक्त त्याच्या सोशल मीडिया पेजवरून पैसे कमवतो.

12/13
प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न सुरू
प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न सुरू

विजय मल्ल्याविरुद्धच्या कायदेशीर खटल्यांमुळे सिद्धार्थ मल्ल्याच्या संपत्तीत चढ-उतार होतोय. ईटीच्या अहवालानुसार, 2023 मध्ये सिद्धार्थ मल्ल्याची एकूण संपत्ती 380 दशलक्ष डॉलर्स होती. त्याच्या वडिलांच्या व्यवसायाव्यतिरिक्  सिद्धार्थ मनोरंजन आणि मॉडेलिंगमधून देखील कमाई करतो.  भारतीय बँकांकडून 10 हजार कोटी रुपये घेऊन लंडनला पळून गेलेल्या विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

13/13
'किंग ऑफ गुड टाईम्स'
 'किंग ऑफ गुड टाईम्स'

किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या 'किंग ऑफ गुड टाईम्स' म्हणून ओळखला जायचा. फोर्ब्सच्या मते 2013 पर्यंत विजय मल्ल्याची एकूण संपत्ती 750 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 64,53,14,25,000 रुपये होती. आर्थिक फसवणुकीनंतर ईडीने त्याची मालमत्ता जप्त केली. किंगफिंचरचा परवाना रद्द करण्यात आला. त्यानंतर त्याची संपत्ती कमी होत गेली.





Read More