Village Without Roads : विना रस्त्याचे गाव. तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. गावात रस्ता नसला तरी गावाचा विकास थांबलेला नाही. मस्त टुमदार घरे आणि स्वच्छ परिसर. छान वातावण. आनंदी लोक अशीच या गावाची ओळख आहे. आम्ही बोलत आहोत ते गिथॉर्न या गावाबद्दल.
ज्या गावाबाबत आम्ही बोलत आहोत ते नेदरलँडमधील गिथॉर्न गाव. एकही रस्ता सापडणार नाही. येथे कोणाचेही वाहन नाही. त्यामुळे प्रदुषणाचा प्रश्नच नाही. केवळ बोटीतून प्रवास करता येतो.
या गावात जाण्यासाठी पाण्याचा एकमेव मार्ग आहे.
आश्चर्य वाटेल की या जगात असे एक गाव आहे, जिथे आजही रस्ता नाही.
गाव म्हणजे कच्ची घरं, छोटे-छोटे रस्ते, सगळीकडे हिरवळ, प्रत्येकाकडे रोजगारासाठी पशुधन आणि शेतजमीन.
नेदरलँडमधील गिथॉर्न या छोट्या गावाची जगभरात चर्चा आहे. दिसायला खूप सुंदर आहे. या गावात गेल्यावर वेगळाच भास होतो.
हे गाव इतकं सुंदर आहे की इथून डोळ्यांचे पारणे फिटते. या कारणास्तव याला नेदरलँड्सचे व्हेनिस देखील म्हटले जाते. येथे पर्यटक मोठ्या प्रणात भेट देत असतात.
या गावात तुम्हाला एकही रस्ता सापडणार नाही. रस्त्याअभावी स्थानिक नागरिक वाहन खरेदी करत नाहीत. ते केवळ पाण्यातून प्रवास करण्यासाठी बोट खरेदी करतात.
ये-जा करण्यासाठी लोक बोटीचा वापर करतात. हे अनोखे गाव पाहण्यासाठी लोक लांबून येतात. हे गावाची ओळख जगात आहे.