Viral News : मॉडेल आणि प्रभावशाली आर्थर ओउर्सनला 6 बायका आहेत. त्या 6 बायकांना सांभाळणं सोपं नाही, हे सांगत असताना तो त्यांना खुश ठेवण्यासाठी काय जुगाड करतो हे सांगितलं आहे.
आर्थर ओउर्सनने आपल्या 6 पत्नींसोबतचे आयुष्य सोशल मीडियावर शेअर केलंय. हा एकटा माणूस 6 बायकांना सांभाळतो.
लग्न हे मौजमजेसाठी असतं असं आर्थरचं मत आहे. त्याला एक बायको नाही तर सहा बायका आवडतात. प्रत्येकीसाठी काहीही करायला तयार असतो.
खरं तर त्याने अनेक लग्न केलं. काही बायकांनी त्याला घटस्फोट दिला, मात्र आज फक्त 6 बायका त्याच्यासोबत राहतात.
त्याचा या सहा बायका एकाच छताखाली राहतात. त्याने या घराला लव्ह मॅन्शन असं नाव ठेवलं आहे.
तो म्हणाला की, लोकांना वाटतं असेल त्याच्या घरात फक्त भांडणं होत असेल. पण तसं नाही त्याच्या या सहा बायकांसोबत तो अतिशय आरामात या घरात संसार करतो.
सर्वात आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे त्याने अंथरुणावर सर्वांसोबत एक दिनचर्या विकसित केली आहे. त्यानुसार कुठल्या बायकोसोबत कोणत्या दिवशी तो बेडरुममध्ये झोपणार हे लिहून ठेवलं आहे.
तो म्हणतो की, लग्न टिकवण्यासाठी प्रणय आवश्यक आहे. पण लग्नाचा पाया हा त्यावर टिकत नाही. तो म्हणतो की, पत्नीशी मैत्रीपूर्ण नातं असायला हवं, तरच सर्व समस्या दूर होतात.
सोशल मीडियावर आर्थरला अनेक लोक फॉलो करतात. त्याने असंही सांगितलं आहे की, जोडीदारांना लग्नासाठी कसं पटवायचं याबद्दल त्याला यूजर्स टिप्स मागतात.