PHOTOS

कृष्णभक्तीत तल्लीन होत तरुणीनं सनातनी पद्धतीनं बांधली लग्नगाठ; तिला वधुरुपात पाहून सगळेच थक्क

सोशल मीडियावर चर्चेत असणारे हे फोटो तुमच्याही इन्स्टा फीडवर आले असतील. पण हे फोटो नेमके कोणाचे आहेत माहितीये? 

 

Advertisement
1/7
फोटो
फोटो

Wedding Photos : एखाद्या व्यक्तीच्या लग्नाचे फोटो पाहणं ही अनेकांसाठीच पर्वणी असते. ही व्यक्ती ओळखीची असो किंवा नसो, त्या व्यक्तीच्या जीवनातील खास क्षणाचे फोटो पाहणं म्हणजे अनेकांसाठी निखळ आनंद. 

 

2/7
लग्नसोहळा
लग्नसोहळा

असेच एका खास लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. हे फोटो आहेत कॉस्मेटोलॉजिस्ट सिआमाच्या लग्नाचे. 

3/7
कृष्णभक्ती
कृष्णभक्ती

कृष्णभक्तीत तल्लीन होणाऱ्या सिआमानं नुकतीच सनातनी पद्धतीनं लग्नगाठ बांधली आणि तिच्या या खास क्षणांना तिनं सर्वांसमक्षही आणलं. 

4/7
सिआमानं
सिआमानं

कृष्णवर्णीय सिआमानं तिच्या या लग्नसोहळ्यासाठी खास बनारसी साडीला पसंती दिली होती. या साडीला असणारी सोनेरी किनार आणि त्यासोबत तिनं निवडलेले दागिने तिच्या सौंदर्यामध्ये आणखी भर घालून केले. 

5/7
दागिने
दागिने

गळ्यासरशी असणारा सोन्याचा चोकर, माथापट्टी, नथनी, हातात बांगड्या, कपाळावर कृष्णनाम आणि चेहऱ्यावर एक मंद स्मितहास्य असा तिचा एकंदर लूक पाहायला मिळाला. 

 

6/7
सुरेख पेहराव
सुरेख पेहराव

सिआमा आणि तिच्या पतीनं लग्नासाठी अतिशय सुरेख पेहरावाला पसंती दिली होती. कृष्णभक्तीतच मुळात प्रेमाची अनुभूती असून याच अनुभूतीसह सिआमानं तिच्या खास नात्याची सुरुवात केली. 

7/7
खास क्षण
खास क्षण

सिआम आणि तिच्या जोडीदारानं कृष्णभक्तांच्या आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांच्या सहजीवनाची सुरुवात केली. त्यांच्या या खास क्षणाचे साक्षीदार नेटकरीसुद्धा झाले. (सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)





Read More