PHOTOS

विराट कोहलीला दहावीत किती टक्के मिळाले होते? Marksheet आली समोर

Virat Kohli Education : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने 12 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यापूर्वी तो टी 20 क्रिकेटमधून सुद्धा निवृत्त झाला आहे. विराट कोहलीने खेळाच्या मैदानावर अनेक रेकॉर्डस् केले असून भारताचं नाव उज्ज्वल केलंय. काही दिवसांपासू विराट कोहलीची 10 वी इयत्तेची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. तेव्हा विराटच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊयात. 

Advertisement
1/8

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली हा टेस्ट आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी पुढील काळात तो आंतरराष्ट्रीय वनडे फॉरमॅटमध्ये मात्र खेळताना दिसणार आहे. 

 

2/8

विराट कोहलीला लहानपणापासूनच क्रिकेट खेळाची आवड होती. आवड पाहून त्याला घरच्यांनी देखील प्रोत्साहन दिले आणि दिल्लीच्या एका क्रिकेट अकॅडमीमध्ये तो खेळू लागला. 

 

3/8

विराट कोहली हा बारावी पास आहे. त्याने विशाल भारती पब्लिक स्कूलमधून नववीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांने पश्चिम विहार येथील सेव्हियर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले. 

 

4/8

विराटचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 ला दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला होता. वडील प्रेम कोहली हे एक वकील होते तर आई सरोज कोहली या गृहिणी होत्या. विराटच्या मोठ्या भावाचे नाव विकास आणि बहिणीचे नाव भावना आहे. विराट कोहलीहा बालपण हे उत्तम नगर, दिल्ली येथे गेलं.

 

5/8

देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न विराटला पूर्ण करायचे होते आणि म्हणून त्याने शिक्षण अर्धवट सोडले. असे असले तरी त्याने मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणे क्रिकेटची साधना केली आणि भविष्यात क्रिकेट विश्वात मोठं नाव सुद्धा कमावलं. 

 

6/8

विराट कोहलीयाची 10वी इयत्तेची मार्कशीट सध्या समोर येत आहे. यात विराटला इंग्रजीमध्ये 83, हिंदीमध्ये 75, गणितात 51, विज्ञानात 32, सोशल सायन्समध्ये 81 तर आयटी विषयात 74 मार्क मिळाले.  

 

7/8

विराट कोहलीची ही मार्कशीट 28 मे 2004 ची आहे. यावर त्याचे वडील पी एन कोहली आणि आई सरोज कोहली यांचं नाव सुद्धा लिहिलंय. 

 

8/8

देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न विराटला पूर्ण करायचे होते आणि म्हणून त्याने शिक्षण अर्धवट सोडले. असे असले तरी त्याने मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणे क्रिकेटची साधना केली आणि भविष्यात क्रिकेट विश्वात मोठं नाव सुद्धा कमावलं. 

 





Read More