Anushka Sharma On Virat Kohli Food: भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू असलेल्या विराटसंदर्भात त्याच्या पत्नीने एक फारच रंजक खुलासा केला आहे. मात्र हा खुलासा तुमच्याशीही कसा संबंधित आहे आणि तुम्हालाही हा पदार्थ कसा मारक ठरतोय समजून घ्या...
एका मुलाखतीमध्ये विराटची पत्नी अनुष्का शर्मानेच हा खुलासा केला असून तिने अगदी नाव घेत याबद्दल का भाष्य केलं आहे समजून घ्या....
क्रिकेटमधील सर्वात आघाडीच्या खेळाडूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीबद्दल त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने मोठा खुलासा केला आहे.
विराट कोहली वयाच्या 36 व्या वर्षीही विराट कोहली एवढा फिट आणि फाइन कसा याबद्दल अनुष्काने एक खास गुपीत सांगितलं आहे. विराट हा केवळ त्याच्या व्यायामासाठी नाही तर त्याबरोबर घेत असलेल्या संतुलित आहारासाठी ओळखला जातो.
अनुष्काने विराटने त्याच्यात केलेल्या बदलांबद्दल भाष्य केलं आहे. "मी अगदीच स्पष्ट सांगायचं झाल्यास तो त्याच्या तब्बेतीबद्दल आणि फिटनेसबद्दल फार दक्ष आहे," असं अनुष्का म्हणाली.
"तो रोज सकाळी लवकर उठून कार्डीओ किंवा एचआयआयटी करतो. तसेच आम्ही दोघेही एकत्र क्रिकेटचा सराव करतो. त्याचा डाएट फार सोपा आणि स्पष्ट आहे," असं अनुष्का शर्माने म्हटलं आहे.
"तो जंक फूड खात नाही. साखर असलेली पेय पीत नाही," असं अनुष्काने सांगितल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याच व्हिडीओमध्ये अनुष्काने विराटबद्दल बोलताना, "तुमचा विश्वास बसेल की नाही ठाऊक नाही पण मागील 10 वर्षांमध्ये त्याने कधीच बटर चिकन खाल्लेलं नाही," असंही म्हटलं आहे.
मात्र अनुष्काने एवढा जोर देऊन बटर चिकनबद्दल सांगण्यामागील कारण म्हणजे हा पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने तसा अपायकारकच म्हणता येईल. अनेक आरोग्यतज्ज्ञांच्या मते बटर चिकन ही डिश आरोग्याच्या दृष्टीने एखाद्या वाईट स्वप्नासारखी आहे.
बटर चिकनमध्ये मेदाचं (फॅट्सचं) प्रमाण अधिक असतं. बटर चिकनमध्ये 450 कॅलरीज, 14 ग्राम कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) आणि 28 ग्राम फॅट्स असतात. यामध्ये 12 ग्रॅम स्टॅच्यूरेटेड फॅट्स असतात. मात्र बटर रोटी किंवा नानबरोबर बटर चिकन खातो तेव्हा कॅलरीजचं प्रमाण 1300 पर्यंत जातं. एका जेवणामध्ये एवढ्या कॅलरी खाल्ल्या जातात.
हॉटेलमधील बटर चिकनमध्ये टोमॅटोचा अंबटपणा कमी करण्यासाठी बटर चिकनमध्ये साखरही टाकली जाते. त्यामुळेच बटर चिकन ही पोषक तत्वांचा विचार केल्यास फारच घातक पदार्थ म्हटला जातो.
स्टॅच्यूरेटेड फॅट्स हा आरोग्याच्या दृष्टीने सर्वात घातक घटक असतो. यामुळे हृदयासंदर्भातील आजारांची दाट शक्यता असते असं अनेक अभ्यासांमध्ये समोर आलं आहे. यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढतं.
बटर चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या स्टॅच्यूरेटेड फॅट्समुळे एलडीएलसंदर्भातील समस्याही निर्माण होते. एलडीएल एक प्रकारचं प्रोटीन असून याच्या मदतीने रक्तामधून कोलेस्ट्रॉलचा प्रवाह संतुलित केला जातो. याचं प्रमाण वाढलं तर नसा आणि धमण्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक्सची समस्या निर्माण होऊ शकते.
त्यामुळेच या पुढे बटर चिकन खाताना तुम्ही सुद्धा अधिक सतर्क असणं आणि त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतोय यासंदर्भात कल्पना असणं महत्त्वाचं आहे. (Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.) (फोटो सोशल मीडिया आणि 'झोमॅटो'वरुन साभार)