T20 World Cup: विराट कोहली गेला बराच काळ टी-20 फॉर्मेटमध्ये खेळलेला नाही. त्यामुळे विराट कोहलीला टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळणार नसल्याची चर्चा होती.
आगामी टी-20 वर्ल्डकपमधून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला वगळलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकप खेळला जाणार आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या जागा नव्या खेळाडूंना संधी दिली जाणार असल्याचं म्हटलं जात होतं.
मात्र आता माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी एक पोस्ट केली असून त्याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
पोस्टमध्ये किर्ती आझाद म्हणाले, विराला टी-20 टीममध्ये संधी मिळत नसल्याबद्दल इतर सिलेक्टरशी बोलण्याची आणि त्यांनी समजावण्याची जबाबदारी अजित आगरकर यांना दिली होती.
यासाठी वेळही देण्यात आली असून सूत्रांच्या मते, अजित आगरकर यासाठी ना सिलेक्टर्सना विराटबद्दल समजवू शकले ना स्वत:ला पटवून देऊ शकले.
याबाबत जय शाह यांनी रोहितला विचारलं असता तो म्हणाला, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विराट कोहली टीममध्ये हवा आहे.
त्यामुळे आता विराट कोहली जवळपास टी-20 वर्ल्डकप खेळणार असल्याचं निश्चित मानलं जातंय.