तुम्हाला माहितीये का या सेलिब्रिटींच्या आहारात नेमका कोणता महत्त्वाचा घटक असतो?
विराट कोहली, सुनील शेट्टी या आणि अशा काही सेलिब्रिटींकडे पाहिल्यानंतर यांच्याइतका फिटनेस हवा, असं अनेक मित्र म्हणत असतील. काहींनी तर त्यासाठीचे प्रयत्नसुद्धा सुरू केलेच असतील यात शंकाच नाही.
असं म्हटलं जातं की संतुलित आहार एका चांगल्या जीवनशैलीला प्रवृत्त करणारा घटक आहे. किंबहुना या सेलिब्रिटी मंडळींच्या आहारातही एक गोष्ट समान आहे. या संतुलित आहारातसुद्धा जास्त प्राधान्य मिळणारा घटक कोणता माहितीये? हा घटक आहे प्रोटीन, अर्थात प्रथिनं.
खुद्द विराट कोहलीसुद्धा याच मताना असून, 'men's fat loss coach' अभी राजपूत यानं X च्या माध्यमातून शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये याचं महत्त्वं सांगितलं आहे. प्रोटीनमुळं शरीरातील स्नायूंना बळकटी मिळून स्नायू तयार होण्यासही मदत मिळते.
आपल्या या मताविषयी सांगताना अभीनं विराट कोहलीच्या आहारातील सवयीमध्ये असणारी शिस्त अधोरेखित केली. विराट कायमच सक्तीचं डाएट फॉलो करतो आणि व्यायामालाही प्राधान्य देतो, असं त्यानं इथं सांगितलं.
अभिनेता सुनील शेट्टीसुद्धा त्याच्या आहारामध्ये प्रोटीनला प्राधान्य देऊन तो ग्रॅममध्ये याचं वजन करूनच आहारात समावेश करतो. हिरव्या भाज्या आणि प्रथिनयुक्त पदार्थ असे पहार्थ त्याच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असतात.
आपण नेमकं किती खातोय यावरही सुनील शेट्टीचं काटेकोर लक्ष असतं असं अभी राजपूतनं आवर्जून सांगत आहाराच्या सवयींमध्ये काही आराखडेही महत्वाचं असल्याचं सांगितलं.
भारतीय क्रीडा क्षेत्राला एका नव्या उंचीवर नेण्याऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा याचं उदाहरण देत त्यानं चिकन, मासे आणि अंड्यांच्या सेवनावर भर दिल्याचं स्पष्ट केलं. याशिवाय पनीर आणि टोफूसुद्धा नीरजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असल्याचं त्यांनं सांगितलं.
चांगल्या आहारसोबतच उत्तम पचनक्रीया, खाण्यापिण्याच्या आवडी आणि शारीरिक हालचाल अर्थात व्यायाम किंवा तत्सम व्यायाम प्रकारही तितकेच महचत्त्वाचे असून, आहारात आणि जीवनशैलीत हे बदल केले तरीसुद्धा सकारात्मक बदल स्पष्टपणे दिसू लागतीत असं ही जाणकार मंडळी सांगतात.
(वरील माहिती जाणकारांची वैयक्तिक मतं असून, झी 24 तास त्याची खाजरमा करत नाही. आरोग्यविषयक गोष्टींसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)