Virender Sehwag On Coaching : टीम इंडियाचा माजी विस्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. सेहवागचा मार्मिक टोला अनेकांचं मनोरंजन करत आलाय. अशातच आता सेहवागने मोठं वक्तव्य केलंय.
एका मुलाखतीमध्ये बोलताना वीरेंद्र सेहवागने भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं आहे. त्यावेळी सेहवागने कारण देखील स्पष्ट केलं.
टीम इंडियाचा प्रशिक्षक नाही, पण आयपीएलच्या कोणत्याही संघाने प्रशिक्षकपदाची ऑफर आली तर मी नक्की बघेन, असं वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.
कारण मी भारतीय संघाचा प्रशिक्षक झालो, तर माझ्याकडे पुन्हा 15 वर्षे क्रिकेट खेळतानाची जुनी दिनचर्या असेल. वर्षातील 8 महिने घराबाहेर राहावे लागेल, असंही सेहवाग म्हणतो.
माझी मुलं अजून लहान आहेत. ती 14 आणि 16 वर्षांची आहेत आणि त्यांना माझी गरज आहे, त्यामुळे मी आता जास्त दिवस घरापासून राहू इच्छित नाही, असं देखील सेहवाग म्हणालाय.
दरम्यान, वीरेंद्र सेहवागचा खास मित्र गौतम गंभीर सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. 2018 पासून सेहवाग कोचिंगपासून दूर राहिलाय. त्यामुळे सेहवाग कोणत्या आयपीएल संघात सामील होणार? असा सवाल विचारला जातोय.