PHOTOS

वीरेंद्र सेहवागचं दिल्लीतील आलिशान घर! 130 कोटींच्या 'या' घरात असं काय आहे खास? पाहा Inside Photos

Virender Sehwag House Inside Photo: भारताचा दिग्गज माजी क्रिकेटर आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने 14 वर्ष भारतीय क्रिकेट संघात योगदान दिलं. वीरेंद्र सेहवागचं दिल्लीतील हौज खास भागात  कृष्णा निवास नावाचं आलिशान घर आहे. एवढंच नाही तर नजफगढ़ आणि हरियाणा येथे सुद्धा त्याची करोडोंची संपत्ती आहे. 

Advertisement
1/8

भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याचं दिल्लीतील हौज खास भागात आलिशान घर असून हा दिल्लीतील सर्वात पॉश परिसर आहे. येथे अनेक व्यावसायिक, प्रोड्युसर इत्यादी दिग्गज आणि नामवंत व्यक्तींची घर आहेत. 

2/8

वीरेंद्र सेहवागने त्याच्या घराचं नाव भगवान कृष्णच्या नावावरून 'कृष्णा निवास' असं ठेवलंय, मीडिया रिपोर्ट्सनुसार एक एकरमध्ये बांधलेल्या या बंगल्यात एकूण 12 आलिशान खोल्या असून गाड्यांसाठी लग्जरी गॅरेज आणि डॉग्स क्वार्टर सुद्धा आहे. 

3/8

कृष्णा निवासमध्ये असलेल्या 12 आलिशान खोल्यांमध्ये सेहवागच्या ट्रॉफी आणि पुरस्कार सजवून ठेवलेले आहेत जे त्याने आपल्या क्रिकेट करिअर दरम्यान जिंकल्या होत्या. सहवाग डॉग लवर असून त्याच्या घरात अनेक श्वान आहेत. 

4/8

रिपोर्टनुसार सेहवागचं हे घर अतिशय आलिशान असून यात सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. त्याच्या घरी फिटनेस ट्रेनर, शेफ, पुजारी इत्यादी असतात. तसेच त्याच्या शेजारी त्याचे खास मित्र, सेलिब्रिटी इत्यादींची घर आहेत. 

 

5/8

वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियासाठीचं बहुतांश शूट हे त्याच्या घरीच करतो.  अनेक जाहिरातींचं शूट त्याच्या घरीच होतं. अनेकदा तो लाईव्ह ब्रॉडकास्टमध्ये सुद्धा त्याच्या घरूनच बोलत असतो. 

 

6/8

वीरेंद्र सेहवागचा जन्म नजफगढ़मध्ये झाला असून तिथे आजही त्याचं घर आहे. हौज खासमध्ये  शिफ्ट होण्यापूर्वी सेहवाग इथेच राहायचा. वीरेंद्र सेहवागचं हे घर इंडियन आणि वेस्टर्न डिझाईनचं मिश्रण आहे. सहवागच्या जुन्या घराची किंमत सुद्धा 23 कोटींच्या जवळपास आहे. 

7/8

वीरेंद्र सेहवाग याचे हरियाणामध्ये सुद्धा एक फार्म हाऊस आहे, जे त्याने 2014 मध्ये बांधले होते. याशिवाय ते हरियाणामध्ये एक शाळा (सेहवाग इंटरनॅशनल स्कूल) देखील चालवतात. 

 

8/8

वीरेंद्र सेहवागने भारतासाठी 104 टेस्ट, 251 वनडे आणि 19 टी 20 सामने खेळले आहेत. टेस्टमध्ये सेहवागने 8586 धावा, वनडेमध्ये 8273 धावा आणि टी 20 मध्ये 394 धावांची कामगिरी केली. यादरम्यान त्याने अनेक रेकॉर्डस् आपल्या नावावर केले. 





Read More