PHOTOS

Vish Yoga : महाशिवरात्रीनंतर माघ अमावस्येला ‘विष योग’! ‘या’ लोकांनी राहावं सावधान

Vish Yoga : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक ग्रह एकत्र येतात त्यातून कुंडलीत काही योग निर्माण होतात. काही योग हे अतिशय शुभ असतात पण काही योग हे अशुभ मानले जातात. महाशिवरात्रीनंतर माघ अमावस्येला धोकादायक विष योग निर्माण होणार आहे. हा विष योग तीन राशीच्या लोकांसाठी घातक ठरणार आहे. 

 

Advertisement
1/7

महादेव शंकराला समर्पित महाशिवरात्रीचा उत्साह बुधवारी 26 फेब्रुवारी 2025 साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी ज्योतिषशास्त्रानुसार अनेक शुभ योग जुळून येणार आहे. महाशिवरात्री ही काही राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. पण त्यानंतर शनि आणि चंद्रामुळे अतिशय धोका असा योग तयार होणार आहे. 

2/7

महाशिवरात्रीनंतर दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारी 2025 ला माघ अमावस्या असणार आहे. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला स्नान, दानाला विशेष महत्त्व आहे. अमावस्या तिथीला पूर्वजांसाठी पूजा करण्यात येते. माघ अमावस्या दीड दिवसांसाठी काही राशींच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे.

3/7

हा विष योग शनीच्या कुंभ राशीत निर्माण होणार असून शनि आधीच त्याच्या कुंभ विराजमान आहे. तर 27 फेब्रुवारीला चंद्राच्या संक्रमणामुळे तो कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे, कुंभ राशीत शनि आणि चंद्राची युतीतून अशुभ विष योग निर्माण होणार आहे. 

4/7

ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत विष योगाची निर्मिती 3 राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची किंवा अपघात किंवा आजाराला बळी पडण्याची शक्यता आहे. 

5/7

कर्क राशीचा स्वामी चंद्र असून विष योगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. नवीन काम सुरू करणे टाळलेलेच बरे. तसेच कोणाशीही वाद घालू नका. भगवान शिवाची पूजा करणे तुम्हाला हिताच ठरणार आहे. 

6/7

कन्या राशीच्या लोकांसाठी, विष योगामुळे काही कामात अपयश येणार आहे. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. या दिवशी प्रवास टाळा. व्यवसायाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी तणाव असणार आहे. 

7/7

मीन राशीच्या लोकांनाही विष योग नुकसानदायक आहे. अनावश्यक खर्च तुमचे बजेट बिघडू शकतात. कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होणार आहे. नवीन काम सुरू करणे टाळा. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Read More