PHOTOS

मुंबई-पुणे दरम्यान घेता येणार धबधबे आणि निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद, डेक्कन एक्सप्रेसमध्ये प्रथमच व्हिस्टाडोम कोच

Advertisement
1/5

रेल्वेने मुंबई - पुणे विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनच्या सेवा व्हिस्टाडोम कोचसह दि. २६.६.२०२१ पासून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.  या मार्गावर प्रथमच ही ट्रेन व्हिस्टाडोम कोचसह चालणार आहे. 

2/5

प्रवाशांना प्रवास करतानाचे पश्चिम घाट, माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसधरी जवळील), उल्हास नदी (जांबरूंग जवळील), उल्हास व्हॅली, खंडाळा परिसर, लोणावळा आणि दक्षिण पूर्व घाट विभागातील बोगदे आणि धबधबे या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेता येणार आहे.

3/5

विस्टाडोम कोचच्या मूलभूत विशेष वैशिष्ट्यांमध्ये वाइड विंडो पॅन आणि काचेचे छप्पर (टॉप), फिरण्यायोग्य खुर्ची आणि पुशबॅक खुर्च्या यांचा समावेश आहे.

4/5

01007 विशेष डेक्कन एक्स्प्रेस दि. २६.६.२०२१ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून  दररोज ०७.०० वाजता सुटेल आणि  त्याच दिवशी ११.०५ वाजता पुण्याला पोहोचेल.

01008 डेक्कन एक्स्प्रेस विशेष दि. २६.६.२०२१ पासून दररोज १५.१५ वाजता पुण्याहून सुटेल आणि  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १९.०५ वाजता पोहोचेल.  

5/5

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.





Read More