फोक्सवॅगनचा प्रदुषण घोटाळा उघडकीस आल्यानंतर अमेरिकेत ३.५० लाख डिझल कार पुन्हा मागवण्यात आल्या. यावर ४८ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. कार ठेवण्यासाठी कंपनीला चक्क फुटबॉल मैदान, पेपर मिल आणि कब्रस्तान सारख्या जागा भाड्याने घ्याव्या लागल्या आहेत. अशा प्रकारच्या ३७ जागांवर कार ठेवण्यात आल्या आहेत.
आता २०१९ पर्यंत १.६ लाख कोटी रुपयांच्या कार मागवल्या असून या कार पुन्हा बाजारात आणण्यात येतील.
कंपनीच्या प्रवक्त्यानुसार, या कारमध्ये आवश्यक सुधारणा करुन मार्केटमध्ये आणण्यात येतील. बायबॅक प्रोसेस २०१९ पर्यंत सुरु राहणार आहे. कंपनीने यासाठी १.६२ लाख कोटी रुपयांचा बजेट वेगळं ठेवण्यात आलं आहे.
कंपनीने स्वत: १.१ कोटी कारमध्ये गडबड असल्याचं मान्य केलं होतं.
२०१५ मध्ये अमेरिकन एजन्सीने फोक्सवॅगनचा घोटाळा उघडकीस आणला होता. त्यावेळी कंपनीने मान्य केलं की, कंपनीच्या गाड्यांमधून होणारे प्रदूषण उत्सर्जन मोजणाऱ्या सॉफ्टवेअरचा घोटाळा केला होता.
ग्लोबल एमिशन स्कँडलमध्ये अडकल्यानंतर फोक्सवॅगनने भारतातीलही ३.२३ लाख कार पुन्हा मागवल्या. एमिशन टेस्टमध्ये गडबड करण्यासाठी कंपनीने या कारमध्ये चीट डिव्हाईस लावले होते.