PHOTOS

पोटावरील चरबी कमी करायची आहे? महागडे डाएट, जीम नाही घरच्याघरी करा 'ही' 7 योगासने

Loose Belly Fat at Home: आजकाल वजन कमी करणे ही एक महत्त्वाची समस्या बनली आहे. आपली चुकीची जीवनशैली याचे एक कारण आहे. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? महागडे डाएट किंवा जीम न करता तुम्ही घरच्याघरी काही योगासने करून तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता.

Advertisement
1/8
1. नौकासन
1. नौकासन

नौकासन केल्यामुळे आपल्या पोटाचे स्नायू मजबूत होतात, पचन सुधारते, मणके लवचिक होतात. याशिवाय पोटाची आणि पायाची चरबी कमी होण्यास मदत होते. 

2/8
2. कपालभाती
2. कपालभाती

कपालभाती केल्याने पोटाची चरबी कमी होते. ओटीपोटाचे स्नायू टोन होतात. रोज कपालभाती केल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो. 

3/8
3. सूर्य नमस्कार
3. सूर्य नमस्कार

दररोज सूर्यनमस्कार केल्याने अनेक फायदे मिळतात. जसे संपूर्ण शरीराची लवचिकता वाढते, स्नायू मजबूत होतात, पचन सुधारते आणि दिवसभर तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकून राहते. महत्त्वाचे म्हणजे वजन कमी करण्यास मदत होते.

4/8
4. पादहस्तासन
4. पादहस्तासन

पादहस्तासन केल्यामुळे पाठ, पाय आणि पोट्याच्या स्नायूंवर ताण येतो. डोकेदुखी आणि निद्रानाशाची समस्या दूर होते. पचन सुधारून पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

5/8
5. त्रिकोणासन
5. त्रिकोणासन

या मुद्रेमुळे तणाव कमी होतो. पचन सुधारून पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. 

6/8
6. वज्रासन
6. वज्रासन

जेवण झाल्यावर काही मिनिटे वज्रासनामध्ये बसल्यास पचन चांगले होते. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होते. 

7/8
7. भुजंगासन
7. भुजंगासन

भुजंगासन शरीर आणि मन दोन्हीसाठी फायदेशीर आहे. यामुळे कंबर, खांद्यांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. भुजंगासनाचा रोज सराव केल्यास पोटाची चरबी कमी करता येते. 

 

8/8

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)





Read More