मुंबईमध्ये देखील तापमानत वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळा सुरु होताच पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या कडाक्यामुळे पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच धरणांतील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे.
पावसाळ्याला अजून तीन महिने बाकी आहेत. अशातच आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाण्याची पातळी ही झपाट्याने कमी होत आहे.
त्यामुळे आता मुंबईकरांना धरणांमध्ये असणाऱ्या पाणीसाठ्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे आता नागरिकांनी पाणी जपून वापरावे असं पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
मुंबईकरांना सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो. ज्यामध्ये मोडक सागर, तानसा धरण, मध्य वैतरणा, विहार धरण, तुळशी धरण, अप्पर वैतरणा आणि भातसा धरण.
सध्या काही धरणांमधील पाणीसाठा 42 टक्के झाला असून मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा धरणांमधील पाणीसाठी 50 टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे.
सध्या मोडक सागर धरणांमध्ये 22 टक्के म्हणजेच 29 हजार 201 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता 1 लाख 28 हजार 925 दशलक्ष लिटर आहे.
तर तानसा धरणाची पाणीसाठा साठवण क्षमता 1 लाख 44 हजार 80 प दशलक्ष लिटर आहे. यामध्ये सध्या 50 हजार 629 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.