राधिका आपटेच्या एका वादग्रस्त चित्रपटातून एक सीन काढून टाकण्यात आला आहे. यामुळे अनेक लोकांनी सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली आहे.
बॉक्स ऑफिसवर सध्या नवीन कंटेंट असलेले चित्रपट खूपच ट्रेंड करत आहेत. या यादीमध्ये 2024 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आलेल्या एका चित्रपटाचाही समावेश आहे.
या चित्रपटात एक नवीन कथा दाखवण्यात आली आहे. ज्यामुळे प्रेक्षकांवर खोलवर प्रभाव पडला आहे. सध्या हा चित्रपट ओटीटीवर खूप ट्रेंड करत आहे.
या चित्रपटातील प्रत्येक सीन हे प्रेक्षकांना थक्क करणारे आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करत आहे.
या चित्रपटाचे नाव 'सिस्टर मिडनाइट' आहे. चित्रपटात राधिका आपटेने महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील राधिकाचा विना कपड्याचा सीन काढून टाकण्यात आला आहे.
'सिस्टर मिडनाइट' हा चित्रपट ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. तो तुम्ही मोफत देखील पाहू शकता. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.
'सिस्टर मिडनाइट' या चित्रपटाने जगभरात $3,06,225 इतकी कमाई केली. या चित्रपटाची कथा ही एका उमा नावाच्या तरुणीभोवती फिरते. लग्नानंतर एकाकीपणातून बाहेर पडण्यासाठी ती प्रयत्न करत असते.
या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन देखील मिळालं आहे. या चित्रपटातील सीन आणि उमाचे धाडस हे सर्व या कथेला जबरदस्त वळण देते.
या चित्रपटात राधिका आपटेसह अशोक पाठक, छाया कदम, स्मिता तांबे यासारख्या कलाकारांनी काम केलं आहे. हा चित्रपट 1 तास 47 मिनिटांचा आहे.