PHOTOS

Weekly Finance Horoscope : 'या' आठवड्यात 5 राशींच्या घरात पडेल नोटांचा पाऊस, तुमची रास यात आहे का?

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य  1 ते 7 मे 2023 : बघता बघता नवीन वर्षाचे चार महिने संपले आणि मे महिना सुरु झाला. मे महिन्यात चंद्रग्रहणासोबत 4 ग्रह आपली राशी बदलणार आहेत. अशात यामुळे हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. (Weekly Finance Horoscope 1st May to 7th May 2023)

Advertisement
1/13
आर्थिकदृष्ट्या कसा असेल हा आठवडा?
आर्थिकदृष्ट्या कसा असेल हा आठवडा?

आजपासून सुरु होणारा मे महिन्यातील पहिला आठवडा हा करिअर आणि आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून घ्या. या आठवड्यात शुक्र गोचर असल्याने काही राशींचं (shani vakri mangal gochar in may month) भविष्य पलटणार आहे. 

2/13
मेष (Aries)
मेष (Aries)

या राशींच्या आयुष्यात हा आठवडा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. करिअरच्या दृष्टीकोनातून तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. आर्थिक प्रगतीसाठी कामाच्या शैलीत बदल करावा लागेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती जरा बरी होईल. 

 

3/13
वृषभ (Taurus)
वृषभ (Taurus)

कामाच्या ठिकाणी विचारपूर्व निर्णय घेतल्यास लाभा होईल. आर्थिक प्रगतीसाठी अंतर्ज्ञानाचं पालन करावे लागेल. तुम्हाला या आठवड्यात आनंदाची बातमी मिळणार आहे. आर्थिक व्यवहारात जवळची व्यक्ती मदत करणार आहे. मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. 

4/13
मिथुन (Gemini)
मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली आहे. धनलाभाचे संयोग जुळून आले आहेत. नवीन गुंतवणुकीतून आर्थिक प्रगतीचा मार्ग सापडणार आहे. प्रवासाचे योग असून त्यातून शुभ वार्ता मिळणार आहेत. 

5/13
कर्क (Cancer)
कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या खर्च ठरणार आहे. ऑफिसमध्ये प्रगती दिसून येईल. या आठवड्याच तुम्हाला एखादी जवळची व्यक्ती मदत करेल. आरोग्य सुधारणार आहे. आठवड्याचा शेवट सुख समृद्धी घेऊन येणार आहे. 

6/13
सिंह (Leo)
सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या शुभ ठरणार आहे. प्रगतीचा शुभ योग आणि जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे. मात्र या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष द्या. 

7/13
कन्या (Virgo)
कन्या (Virgo)

या राशींसाठी आठवडाच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा शुभ संयोग घेऊ आला आहे. कुटुंबात सुख समृद्धी दोघांचा वास असणार आहे. या आठवड्यात प्रवासाचे योग आहेत. आठवड्याच्या शेवटी विचारपूर्वक निर्णय घेतल्यास लाभ होईल. 

8/13
तूळ (Libra)
तूळ (Libra)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. धनलाभाचे योग आहेत. प्रवासातून फायदा होईल. तुम्हाला दिलेलं काम लक्षपूर्वक करा. कामाच्या ठिकाणी आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग दिसणार आहेत. कुटुंबात सगळं छान असणार आहे. मात्र एखाद्या गोष्टीने मन विचलित होईल.

9/13
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या समाधानाचा असणार आहे. घरात सुख समृद्धीचं शुभ योग जुळून आले आहेत. प्रवासातून आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. बाहेरील व्यक्तीला तुमच्या जीवनात ढवळाढवळ करु देऊ नका. या आठवड्याच तुमचा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. खरेदीवर नियंत्रण ठेवा. 

10/13
धनु (Sagittarius)
धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि या काळात तुम्हाला आर्थिक बाबतीत चांगली समज असलेल्या व्यक्तीची मदत देखील मिळेल. या आठवड्यात आर्थिक प्रगतीचे शुभ योगायोगही घडत असून पैशात वाढ होईल आणि या आठवड्यात तुम्ही पार्टी मूडमध्ये असाल. प्रवासाच्या माध्यमातूनही या आठवड्यात शुभवार्ता प्राप्त होत आहेत. सप्ताहाच्या शेवटी मातृसत्ताक स्त्रीची मदत मिळू शकते.

11/13
मकर (Capricorn)
मकर (Capricorn)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी थोडा बरा नाही. कामाच्या ठिकाणी जरा टेन्शन असणार आहे. तर हा आठवडा तुम्हाला अधिक खर्चात पाडणार आहे. प्रवासचे योग असून त्यातून सकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्या मंडळींमुळे तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडून येतील. आठवड्याचा शेवट हा आनंदाने होणार आहे. 

12/13
कुंभ (Aquarius)
कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगती घेऊन येणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही नियोजन करणार आहात. भविष्यातील गुंतवणूक तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. तुमच्या इच्छेनुसार गोष्टी होणार आहेत. जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक सल्ला मिळणार आहे. प्रवासातून यशाचे नवीन मार्ग मिळणार आहेत. 

13/13
मीन (Pisces)
मीन (Pisces)

हा आठवड्या या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे. संकुचित मानसिकता तुमच्यासाठी घातक ठरणार आहे. धनप्राप्तीचे योग आहेत. प्रवास टाळणं तुमच्यासाठी योग ठरणार आहे. कुटुंबातील वाद संवादातून सोडवा अन्यथा गोष्टी हाताबाहेर जातील. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More