Weekly Horoscope 17 to 23 March 2025 in Marathi : मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात शुक्रदित्य राजयोगाचे शुभ योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्रादित्य राजयोग खूप प्रभावी मानला गेलाय. शुक्रादित्य राजयोगात, व्यक्तीला पैसे कमविण्याच्या उत्तम संधी प्राप्त होतात आणि त्याची संपत्तीत वाढसोबत आदर वाढतो. या आठवड्यात शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे मेष आणि मकर राशीसह 5 राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत हा आठवडा फलदायी असणार आहे. अचानक पैसे मिळाल्याने तुमच्या अनेक जुन्या योजना यशस्वी होणार आहेत. मार्चचा तिसरा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल, जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा पैशाच्या बाबतीत चांगला असणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणार असून गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे. अनुभवी व्यक्तीच्या मदतीने संपत्तीत वाढ होणार आहे. कुटुंबात आनंद आणि प्रेम वाढणार आहे. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण लक्ष प्राप्त होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला प्रवासाबाबत थोडी चिंता असणार आहे. मात्र नंतर तुम्हाला यश मिळणार आहे. कुटुंबासह प्रवासाचा बेत आखता येणार आहे. कामात सुधारणा पाहिला मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थोडे एकटेपणा जाणवणार आहे. शुभ दिवस: 17, 21
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक लाभाच लाभ घेऊन आला आहे. वृषभ राशीच्या लोकांना कामात प्रगती पाहिला मिळणार आहे. यशाच्या अनेक संधी प्राप्त होणार आहे. पैशाच्या बाबतीतही सुधारणा होणार आहे. वडीलधाऱ्या व्यक्तीच्या आशीर्वादाने कुटुंबात आनंद आणि शांती राहणार आहे. या आठवड्यात प्रवास न करणे चांगले ठरणार आहे. गुंतवणुकीत नफा आणि कामात सुधारणा पाहिला मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या कानावर वाईट बातमी पडणार आहे. तुमचे ऑफिसचे काम काळजीपूर्वक करा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होण्याचे संकेत आहेत. शुभ दिवस: 18, 20
या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळणार आहे. या आठवड्यात आरोग्य चांगले राहणार आहे. कुटुंबात आनंद राहणार असून प्रेम वाढणार आहे. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत कुठेतरी प्रवास करणार आहात. प्रवासादरम्यान मन प्रसन्न राहणार आहे. कामात प्रगती होणार असून भागीदारीत केलेल्या कामाचे चांगले परिणाम मिळणार आहे. खर्च निश्चितच जास्त होणार आहे. मात्र चांगले उत्पन्न असल्याने शिल्लक राखली जाणार आहे. गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल. आठवड्याचा शेवट चांगला जाईल आणि प्रेम वाढेल. शुभ दिवस: 21, 23
या राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक बाबींमध्ये खूप दिलासा मिळणार आहे. कामात प्रगती होणार असून तुमच्या प्रकल्पाच्या यशाबद्दल तुम्हाला खात्री असणार आहे. पैशाच्या बाबतीत वेळ चांगला राहणार असून आर्थिक लाभचे संकेत आहेत. प्रवासामुळे सामान्य यश आणि आर्थिक लाभ मिळणार आहे. प्रवास टाळा. कौटुंबिक बाबींमध्ये आत्मविश्वासाने निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आराम मिळणार आहे, मात्र तुमची जबाबदाऱ्याही वाढणार आहे. शुभ दिवस: 17,19
या राशीच्या लोकांसाठी करिअरच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहणरा आहे. तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांती राहणार आहे. प्रवासाचे चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहे. प्रवास आनंद आणि समृद्धी आणणार असून तुमचा आदरही वाढणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंद नांदणार आहे. कठोर परिश्रम करून तुम्ही खूप काही साध्य करणार आहात. पैशाच्या बाबतीत, कोणताही कागदपत्र सही करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा, अन्यथा समस्या निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी आनंद आणि समृद्धी असणार आहे. कुठेतरी अडकलेले पैसे मिळाल्याने तुम्हाला आनंद होणार आहात. शुभ दिवस: 21, 22
या राशीच्या लोकांना कामात प्रगती आणि त्यांचे ध्येय साध्य करता येणार आहे. जर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पैसे गुंतवले तर तुम्हाला चांगले परतावे मिळणार आहेत. तुम्हाला चांगले परिणाम आणि आर्थिक लाभ प्राप्त होईल. आरोग्य चांगले राहणार आहे. मात्र इतरांच्या सल्ल्यानुसार आरोग्याशी संबंधित उपक्रम राबवल्यास ते अधिक चांगले परिणाम मिळणार आहे. या काळात प्रवास न करणे चांगले होणार आहे. कुटुंबात अहंकाराचा संघर्ष टाळलेला बरा ठरेल. आठवड्याच्या शेवटी एक नवीन सुरुवात आयुष्यात आनंद आणणार आहे. शुभ दिवस: 22, 23
या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत फायदा होणार आहे. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्नही मिळणार आहे. पैशाच्या बाबतीत चांगली समज असलेल्या व्यक्तीकडून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. कुटुंबात काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. या आठवड्यात केलेला प्रवास आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. वेळ चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही वाईट बातमी मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी निष्काळजीपणामुळे त्रास होणार आहे. अनावश्यक खर्च टाळा. जर तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला फायदा मिळणार आहे. शुभ दिवस: 21, 23
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत नफा आणि प्रगतीने भरलेला असणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचे चांगले फायदे तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला कुठूनतरी चांगली बातमी मिळणार आहे. तुम्ही एखाद्या छान ठिकाणी जाण्याचा प्लॅन करणार आहेत. कामात समस्या निर्माण होणार आहे. म्हणून या आठवड्यात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे त्रास होणार आहे. तुम्ही भावनिक होणार आहात. जास्त पैसे खर्च होणार आहे. कुटुंबात भावनिक त्रासही वाढणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला एखाद्या तरुणाबद्दल वाईट वाटणार आहे. शुभ दिवस: 19, 22
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत लाभदायक असणार आहे. या आठवड्यात धनु राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. महिलेच्या मदतीने तुमची संपत्ती वाढणार आहे. त्याच्या आठवणींनी मन आनंदी राहणार आहे. कामात प्रगती होणार असून मान-सन्मान वाढणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासातून सामान्य यश प्राप्त होणार आहे. प्रवास न केल्यास बरे होईल. आठवड्याच्या शेवटी, तुमचे मन एखाद्या प्रवासाबद्दल किंवा नवीन सुरुवातीबद्दल अस्वस्थ असेल, म्हणून ते पुढे ढकलणे चांगेल ठरले. तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. शुभ दिवस: 21, 23
या राशीच्या लोकांना या आठवड्यात कामात प्रगती घेऊन आला आहे. भागीदारीत केलेले काम चांगले परिणाम देणार आहे. तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. या आठवड्यात खर्च जास्त होऊ शकतो आणि कोणत्याही नवीन गुंतवणुकीमुळे अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील कोणत्याही नवीन सुरुवातीबद्दल तुम्हाला वाईट वाटणार आहे. या आठवड्यात प्रवास न करणे चांगले ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला काही वाईट बातमी कानावर पडणार आहे. तुम्हाला मुलाची काळजी वाटणार आहे. तुम्हाला पैशाच्या आणि मानाच्या बाबतीत फायदा होणार आहे. शुभ दिवस: 21, 22
या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत फायदा करणारा हा आठवडा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळणार आहे. काही नवीन गुंतवणूक करा, भविष्यात चांगले परिणाम मिळणार आहे. कामात व्यावहारिक राहून निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचे चांगले परिणाम तुम्हाला मिळेल. कुटुंबात कोणतीही नवीन सुरुवात करताना तुम्हाला भीती वाटणार आहे. म्हणून या आठवड्यात कोणतेही बदल न करणे चांगले ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुमचे मन अस्वस्थ राहणार असून तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्वस्थ व्हाल. शुभ दिवस: 17, 19
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा पैशाच्या बाबतीत चांगला सिद्ध होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आर्थिक लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी आळसामुळे त्रास होईल. या आठवड्यात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, तुमचे मन आनंदी असणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंद मिळणार आहे. या प्रवासात यश मिळणार असून महिला यामध्ये तुम्हाला साथ देणार आहे. तुमच्या संयमाने आणि वर्तणुकीच्या कौशल्याने तुम्ही बरेच काही साध्य करणार आहात. तुम्हाला पैशाच्या आणि मानाच्या बाबतीत फायदा मिळणार आहे. शुभ दिवस: 18, 23 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)