Weekly Horoscope 2 to 8 september 2024 in Marathi : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे कन्या राशीत कालयोग निर्माण होतोय. काल योगाच्या प्रभावामुळे लोकांना पैसा आणि करिअरच्या बाबतीत प्रचंड फायदा होणार आहे. तर काही लोकांसाठी हा आठवडा कठीण असणार आहे. अशात या आठवड्यात कोणासमोर संकट तर कोणावर बरसणार गणेशाची कृपा जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे.
तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जितक्या संयमाने काम कराल तितके चांगले परिणाम मिळणार आहे. आर्थिक बाबतीतही आर्थिक फायद्यासाठी मजबूत परिस्थिती असणार आहे. व्यावसायिक सहली यशस्वी होणार असून आर्थिक लाभ होणार आहे. मात्र, या आठवड्यात अनावश्यक सहली टाळाव्यात. कौटुंबिक बाबींमध्ये अहंकाराचा संघर्ष टाळलात तर बरे होईल. आठवड्याच्या शेवटी समतोल राखलात तर जीवनात सुख-शांती जाणवेल. शुभ दिवस : 2,6 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)