Weekly Horoscope 20 to 26 january 2025 in Marathi : जानेवारीच्या या आठवड्यात, दुहेरी राजयोगाचा शुभ संयोग जुळून आलाय. या शुभ योगामुळे काही राशींच्या आयुष्यात लक्ष्मीचं आगमनासह करिअर आणि व्यवसायात उत्तम यश प्राप्त होणार आहे. कोणासाठी हा शुभ तर कोणासाठी संकटाचा ठरणार आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असून त्यांना कामाच्या ठिकाणी प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी त्यांच्याकडे चालून येणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबात आनंददायी अनुभव लाभणार आहे. तरुणांच्या मदतीने तुम्हाला जीवनात आनंद आणि शांती मिळणार आहे. या आठवड्यात प्रवासातूनही यश मिळणार आहे. जर तुम्ही या आठवड्यात कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर आधी तुमचे बजेट तयार करा. अन्यथा, तुम्ही जास्त पैसे खर्च कराल आणि तुम्ही कमी आनंद घेणार आहात. आर्थिक बाबतीत निराशा येणार असून भागीदारीत केलेले कोणतेही काम तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे. प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. अन्यथा तुमचे नुकसान होईल. या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात उदासीनता असणार असून तुमचे मन खूपच अस्वस्थ असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मनात काही गोष्टींबाबत निराशा वाढवणार आहेत.
शुभ दिवस: 22,24
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत लाभदायक असणार आहे. तुम्हाला व्यवसायात यश मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला पैसे मिळणार आहे. आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. तब्येतीत चढ-उतार असतील पण शेवटी सुधारणा नक्कीच होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाचेही शुभ परिणाम मिळणार असून व्यवसायात प्रगती घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या वृद्ध व्यक्तीबद्दल तुम्हाला वाईट वाटेल. प्रेम जीवनातही अस्वस्थता अधिक राहील आणि मन उदास राहणार आहे. सप्ताहाच्या शेवटी व्यवसायासंबंधी कोणतेही दोन निर्णय घेण्याबाबत मनात काही संभ्रम निर्माण करेल. कामाच्या ठिकाणी धैर्याने निर्णय घेतल्यास जीवनात आनंदीच आनंद असेल. शुभ दिवस: 23,24
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगतीचा असणार आहे. तुमचे कोणतेही प्रलंबित प्रकल्प वेळेवर पूर्ण होणार आहे. परिणाम तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असणार आहेत. या आठवड्यात कौटुंबिक बाबींमध्ये मन अस्वस्थ राहणार आहे. रात्रीची झोप अस्वस्थ असेल. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगले परिणाम मिळतील. या आठवड्यात कोणत्याही नवीन गुंतवणुकीवर खर्च वाढणार आहे. आठवड्याच्या शेवटी कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप तुमचा त्रास वाढणार आहे. तुमच्या आयुष्यात मोठे नुकसान सहन करावं लागणार आहे. या आठवड्यात तुम्हाला काही खर्चांचा सामना करावा लागणार असून ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल. शुभ दिवस: 20, 22
या राशीच्या लोकांच्या व्यवसायात प्रगती घेऊन आला आहे हा आठवडा. एखाद्या महिलेच्या मदतीने तुम्हाला ऑफिसच्या कामात यश मिळणार आहे. आक्रमक व्यक्तिमत्व असलेल्या लोकांकडून तुम्हाला विशेष लाभ मिळणार आहे. आर्थिक बाबतीत सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडणार आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळणार आहे. तुमच्या जीवनात प्रगतीची शक्यता असून तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे. कुटुंबातील एखाद्याच्या मदतीने तुम्ही जीवनात आनंद आणि समृद्धी प्राप्त करणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रवासादरम्यान कठोर परिश्रम करावे लागतील, तरच तुम्हाला आनंददायी परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या विचारावर ठाम राहून निर्णय घेतल्यास तुमचे जीवन सुधारेल आणि तुमच्या जीवनात आनंद येईल. शुभ दिवस: 20,21,22
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत लाभ आणि यशाने भरलेला असणार आहे. तुमच्यासाठी शुभ परिणाम दिसून येणार आहे. मनाचे ऐकून कोणतेही काम केले तर सर्व कामे पूर्ण होणार आहे. तुम्ही कुटुंबात आनंददायी वेळ घालवणार आहात. तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाचे शुभ परिणामही मिळणार आहे. प्रवासामुळे सुखद अनुभव तुमच्या गाठीशी बांधले जाणार आहे. कामाच्या ठिकाणी सर्वांचे ऐका पण मनाला आळा, तरच प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा आहेत पण कोणत्या गुंतवणुकीबद्दल वाईट वाटू शकतं. या आठवड्याच्या शेवटी संयमाने निर्णय घेतल्यास चांगले परिणाम दिसून येणार आहे. शुभ दिवस: 22,23,24
या राशीच्या लोकांसाठी, कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. मात्र ती तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात शुभ परिणाम मिळणार आहे. तुम्ही प्रवासात खूप व्यस्त असणार आहात. या आठवड्यात संयमाने कोणताही निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. आर्थिक बाबींमध्ये अडचणी वाढणार आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये खर्च वाढणार आहे. कुटुंबात अहंकाराचा कलह टाळलात तर बरे होईल. या आठवड्याच्या शेवटी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी खरेदीला जाऊ शकता.
शुभ दिवस: 22,24
या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत सुख आणि समृद्धी घेऊन आला आहे. आर्थिक बाबतीत सुधारणा होणार आहे. कुटुंबात सुख-समृद्धी येणार आहे. तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीबाबत काही खरेदीही करणार आहात. विचारपूर्वक प्रवास केल्यास बरे परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी कोणत्याही नवीन सुरुवातीबद्दल तुम्हाला वाईट वाटेल. या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप पाठिंबा मिळणार आहे. या आठवड्यात तुमच्या व्यवसायात प्रगती होणार आहे. तुमच्या संपत्तीत वाढ मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळवून नफ्यासह आनंद लाणभार आहे. काळ तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. शुभ दिवस: 22,24
या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात आर्थिक बाबतीत यश आणि प्रगतीची घेऊन आला आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही नवीन प्रकल्पाबद्दल तुम्ही आनंदी असणार आहात. त्याचे शुभ परिणाम मिळणार आहे. नवीन सुरुवात तुमच्या करिअरमध्ये सुखद अनुभव घेऊन येणार आहे. आर्थिक बाबींसाठीही हा आठवडा शुभ असून पैशाचे आगमन होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासातही यश मिळणार आहे. तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेणार आहात. तुमच्या अंतर्ज्ञानानुसार तुम्ही कुटुंबात निर्णय घेतल्यास, चांगले परिणाम मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चांगली बातमी समजणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी लाभ आणि प्रगतीचा असणार आहे. शुभ दिवस: 21,23,24
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक दृष्टीकोनातून शुभ असणार आहे. धनाच्या आगमनाच्या शुभ संधी मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आक्रमक व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीची मदत मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आश्वासने या आठवड्यात पूर्ण होणार आहे. तरच तुम्ही तुमच्या बाजूने बॅकअप योजना घेऊन पुढे गेलात. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाचे शुभ परिणाम मिळणार आहे. परंतु तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटणार आहे. सप्ताहाच्या शेवटी वडिलांच्या आशीर्वादाने जीवनात सुखद अनुभव येतील. हा आठवडा तुमच्यासाठी लाभ आणि व्यवसायात प्रगतीचा असणार आहे. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला नफा मिळेल आणि तुमची प्रगती होणार आहे. शुभ दिवस: 21,22,23,24
या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगतीचा आणि अशा स्त्रीच्या मदतीने यश मिळवतील ज्यांनी कठोर परिश्रम करून आपल्या जीवनात स्थान प्राप्त केलंय. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल राहणार असून आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होणार आहे. या आठवड्यात तुम्ही निष्काळजी न राहिल्यास कुटुंबात सुखद अनुभव येणार आहे. प्रवासादरम्यान तुमची एखाद्याकडून फसवणुकीची शक्यता आहे. तुम्ही त्यांना टाळले तर बरे परिणाम मिळणार आहे. तुमचे भागीदार या आठवड्यात तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार नाहीत. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुमच्या जीवनात सुख-सुविधा वाढतील. शुभ दिवस: 21,24
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसायात यशाने भरलेला असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीसोबत भागीदारीत केलेल्या कामाचे तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहे. कार्यालयीन कामावर लक्ष केंद्रित कराल आणि प्रसन्न राहणार आहे. जेव्हा तुम्ही थोडे नेटवर्किंग मूडमध्ये असाल आणि नवीन लोकांना भेटाल आणि पैसे कमवण्यासाठी नवीन गुंतवणूक कराल तेव्हाच आर्थिक बाबी सुधारणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील एखाद्या तरुणाकडून चांगली बातमी मिळणार आहे. प्रवासात यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही संयम ठेवून कोणताही निर्णय घ्याल. आठवड्याच्या शेवटी, एखाद्या वृद्ध व्यक्तीशी अहंकाराचा संघर्ष वाढणार असून आणि याकडे लक्ष देणे आवश्यक असणार आहे. शुभ दिवस: 21,22,23
या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत लाभ होणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल. कुटुंबात एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचे शुभ योगायोग घेऊन येईल. प्रवासातही तुम्हाला यश मिळेल आणि मातृत्वाच्या मदतीने तुम्ही जीवनात आनंदी राहाल. नोकरीच्या ठिकाणी भागीदारीच्या कोणत्याही कामात अडचणी येतील आणि चिंता वाढू शकते. आर्थिक बाबतीत तणाव वाढू शकतो. अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या आयुष्यात आनंद आणि प्रगतीची शक्यता आहे. तब्येतीत अडचणी येतील. या आठवड्याच्या शेवटी जीवनात सुधारणा होतील. शुभ दिवस: 22,23
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)