Weekly Horoscope 21 to 27 July 2025 in Marathi : जुलैचा हा चौथा आठवडा कामिनी एकादशीने होणार आहे. तर या आठवड्यात दीप अमावस्या असणार आहे. त्यासोबत श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रनुसार या आठवड्यात लक्ष्मी योग जुळून आला आहे. हा योग 5 राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांवर लक्ष्मीची कृपा होणार असून त्यांच्यावर धनवर्षावर होणार आहे. एकंदरीत हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम केल्याने सकारात्मक परिणाम प्राप्त होणार आहे. एखाद्या प्रकल्पाच्या यशाबद्दल तुम्हाला खूप दिलासा मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये अनुकूल परिणाम मिळणार आहे. गुंतवणुकीद्वारे आर्थिक लाभ होणार आहे. तुम्हाला आर्थिक बाबींशी संबंधित सहलीला जावं लागणार आहे. जिथे तुम्हाला काही चांगल्या बातम्या देखील मिळणार आहे. पण प्रवासादरम्यान तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. जर तुमचे आरोग्य चांगले नसेल तर या आठवड्यात तुमचे आरोग्य खूप सुधारणार आहे. तुमचे मन आनंदी राहणार आहे. तुम्हाला कौटुंबिक बाबींकडे थोडे लक्ष द्यावे लागणार आहे. अन्यथा समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात, तुमच्या जोडीदारासोबत प्रेम अधिक दृढ होणार आहे. नवीन सुरुवात आयुष्यात शांती आणणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुमच्या व्यवसायात स्वतःवर विश्वास ठेवून निर्णय घेणे चांगले सिद्ध होणार आहे.
आर्थिक बाबतीत, आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत राहणार आहे. पण स्वतःवर विश्वास ठेवून गुंतवणूक केल्याने तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. या काळात तुमची संपत्ती वाढ होणार असून उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडणार आहे. कामाच्या ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीत हळूहळू सुधारणा होणार आहे. तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे वाटचाल करणार आहात. प्रेमसंबंधात परस्पर समजूतदारपणा खूप चांगला असणार आहे. ज्यामुळे तुम्हाला जीवनात आराम मिळणार आहे. तुमचे आरोग्यही चांगले राहणार आहे. कुटुंबात परस्पर प्रेम अधिक दृढ होणार आहे. कुटुंबातील एखादा सदस्य तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबतीत मदत करणार आहे. व्यवसायासंदर्भात या आठवड्यात केलेले प्रवास फायदेशीर ठरू शकतात आणि तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे. ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी, कामात संतुलन राखून तुम्हाला अपार आनंद देणार आहे.
तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुमची प्रगती होणार आहे. काही चांगले प्रकल्प तुम्हाला आकर्षित करणार आहे. जर तुम्हाला आर्थिक बाबतीत समस्या येत होत्या, तर त्या आता दूर होणार आहे. तसंच, संपत्ती वाढ होणार आहे, तुम्हाला एखाद्या महिलेची मदत मिळणार आहे. तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा विचार करणार आहात. हा आठवडा तुमच्यासाठी आयुष्यात एक नवीन सुरुवात करणारा ठरणार आहे. जीवनात आनंद आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहणार आहे. तुम्हाला आनंद मिळणार आहे. आरोग्य देखील सुधारणार आहे. व्यावसायिक प्रवासातून तुम्हाला सामान्य फायदे मिळणार आहेत. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला निष्काळजीपणा टाळावा लागणार आहे, तरच जीवनात आनंद तुम्हाला मिळणार आहे.
आर्थिक बाबतीत तुम्हाला काही चांगल्या बातम्या कानावर पडणार आहे. आयुष्यात तुम्हाला आराम मिळणार आहे. संपत्ती वाढीच्या शुभ शक्यता कायम राहणार आहे. व्यवसायाच्या बाबतीत, एखाद्या तरुणाचे मत तुमच्यासाठी आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होणार आहे. आरोग्याच्या बाबतीत, तुम्हाला या आठवड्यात तुमच्या शरीराला विश्रांती मिळणार आहे. कौटुंबिक बाबतीत हा आठवडा आनंददायी राहणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगल्या ठिकाणी जाण्याची योजना आखणार आहात. या आठवड्यात, कामाच्या संदर्भात केलेले प्रवास यशस्वी होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे मत उघडपणे व्यक्त केल्याने परिस्थिती तुमच्या बाजूने राहणार आहे.
हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत शुभ असणार आहे. व्यवसायातील गुंतवणूक लक्षात ठेवून, चांगल्या भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवल्याने तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याची योजना आखणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रकल्पाबद्दल जास्त कडक राहण्याचे टाळावे लागणार आहे. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शांततेने आणि संयमाने काम पूर्ण केल्याने प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद जीवनात आनंद आणि समृद्धी आणणार आहे. कामाच्या संदर्भात केलेल्या प्रवासातून तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. तुम्ही धार्मिक स्थळी किंवा शांत ठिकाणी प्रवास करण्याची योजना देखील आखणार आहात. आरोग्य चांगले राहणार आहे. प्रेम जीवनात जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे.
तुमच्या कामाच्या क्षेत्रात प्रगती पाहिला मिळणार आहे. वृद्धांच्या मदतीने तुमचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होणार आहे. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहणार आहात. व्यवसायात, तुमच्या बुद्धिमत्तेने आणि बोलण्याच्या पद्धतीने तुम्ही यश प्राप्त करणार आहात. प्रेम जीवन शांत राहणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळणार आहे. आर्थिक बाबतीत भागीदारीत केलेली गुंतवणूक शुभ परिणाम देणार आहे. परंतु काही गुंतवणुकीमुळे तुम्ही दुःखी होणार आहे. कुटुंबात संयमाने कोणताही निर्णय घेणे फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्ही सहलीला जात असाल तर एखाद्या महिला मैत्रिणीमुळे तुमचे मन अस्वस्थ होणार आहे. आठवड्याच्या शेवटी, भागीदारीत केलेल्या कामातून तुम्हाला उत्कृष्ट परिणाम प्राप्त होईल.
आर्थिक बाबतीत, या आठवड्यात तुम्हाला नेटवर्किंगमधून बरेच फायदे मिळणार आहे. आर्थिक लाभ मिळणार आहे. व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास आनंददायी परिणाम देणार आहे. पण, हे परिणाम तुमच्या अपेक्षेपेक्षा थोडे कमी असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता असणार आहे. एखाद्या व्यक्ती किंवा सहकाऱ्यामुळे तुमचा ताण आणखी वाढणार आहे. पण आठवड्याच्या शेवटी, अचानक परिस्थिती सुधारणार आहे. तुम्हाला जीवनात शांती मिळणार आहे. प्रेम जीवनात, तुमच्या जोडीदारासोबतचे प्रेम अधिकच वाढणार आहे. त्याच वेळी, तुम्हाला काही काळ कुटुंबात एकटेपणा जाणवणार आहे.
आर्थिक बाबतीत, तुम्हाला हळूहळू गुंतवणुकीचे सकारात्मक परिणाम या आठवड्यात मिळणार आहे. पण या आठवड्यात तुम्हाला व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित सहलीला जात असाल तर सध्यासाठी ते पुढे ढकलणे योग्य ठरणार आहे. प्रवासासाठी हा काळ चांगला नसणार आहे. व्यवसाय सहली तुम्हाला नफ्याऐवजी नुकसान देणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा, अन्यथा तुमचे नुकसान होईल. पण प्रेम जीवनात खूप आनंद तुमच्या दारावर ठोठावणार आहे. तुमच्या आरोग्यातही सुधारणा पाहिला मिळणार आहे.
कामाच्या ठिकाणी भागीदारीत केलेल्या कामातून तुम्हाला यश मिळणार आहे. प्रगतीचे नवीन मार्गही उघडणार आहे. नोकरी करणारे लोक त्यांच्या ऑफिसमध्ये आनंदी असणार आहेत. प्रकल्पाच्या यशाने आनंदीच आनंद असणार आहे. हा आठवडा आर्थिक बाबतीतही अनुकूल असणार आहे. तसंच, प्रवासातूनही आनंददायी परिणाम मिळणार आहे. पण तुम्ही या सहलींमध्ये अधिक व्यस्त राहणार आहात. आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला दिलेली वचने पूर्ण होणार आहे. त्याच वेळी, कुटुंबातील सर्व सदस्यांशी बोलल्याने परिस्थिती सुधारणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतित करणार आहात.
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला पैशांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळणार आहे. आर्थिक बाबतीत हे तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता असणार आहे. तुमच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे. कामाच्या ठिकाणी भावनिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी कठीण असणार आहे. यामुळे प्रकल्प वेळेवर पूर्ण होणार नाही. याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. झोपेवरही परिणाम दिसून येईल. या आठवड्यात व्यवसायाशी संबंधित सहली पुढे ढकलणे चांगले राहणार आहे. पण आठवड्याच्या शेवटी, तुमच्यासाठी परिस्थिती चांगली असणार आहे.
तुमच्या कामात प्रगती होणार आहे. भागीदारीत केलेले काम यशस्वी ठरणार आहे. आर्थिक बाबतीत परिस्थिती हळूहळू सुधारणार पाहिला मिळणार आहे. आर्थिक लाभाची शुभ शक्यता असणार आहे. पण तुम्हाला कामाच्या ठिकाणी अहंकार टाळावा लागणार आहे. या आठवड्यात तुम्ही धार्मिक स्थळी किंवा शांत एकांत ठिकाणी जाण्याची योजना आखणार आहात. तुमच्या प्रेमसंबंधातील प्रेम अधिक दृढ होणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये आनंद तुमच्या दारावर ठोठवणार आहे.
तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुमची प्रगती पाहिला मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहणार आहात. तुम्हाला एखाद्या प्रकल्पात यश मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. पण तुम्ही कामाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा प्रवास पुढे ढकला. यामुळे प्रवासादरम्यान तुम्हाला एखाद्या वृद्ध व्यक्तीची चिंता वाटणार आहे. आर्थिक बाबींमध्ये नवीन गुंतवणूक केल्याने तुमचे मन अस्वस्थ असणार आहे. पैसे खर्च करण्याची परिस्थिती देखील निर्माण होणार आहे. तणावामुळे तुमचे आरोग्य देखील बिघडण्याची शक्यता आहे. पण आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला नवीन सुरुवातीपासून दिलासा मिळणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)