Weekly Horoscope 21 to 27 october 2024 in Marathi : दिवाळीपूर्वीचा हा ऑक्टोबरचा आठवडा ज्योतिषशास्त्रानुसार भाग्यशाली आहे. या आठवड्यात तूळ राशीमध्ये सूर्य आणि बुध यांचा संयोग घडणार आहे. त्यामुले बुधादित्य राजयोग तयार होणार असून काही लोकांच्या घरी दिवाळीपूर्वीच दिवाळीचा उत्साह असणार आहे. असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य
दिवाळीपूर्वीचा हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीसोबत तुमची प्रशंसा होणार आहे. त्याशिवाय नवीन संधी तुम्हाला लाभणार आहे. कुटुंबात आनंद आणि प्रेम नांदणार आहे. कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाणार आहात. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. प्रवास संस्मरणीय होणार आहे. काही नवीन काम सुरू करायचे असेल तर थोडा विचार करूनच निर्णय घ्या. या आठवड्यात तुमचा खर्च वाढू शकतो. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सन्मान आणि आर्थिक लाभ होणार आहे. शुभ दिवस: 23, 24, 25
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरणार आहे. तुम्ही ज्या प्रकल्पांवर काम करत आहात त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. तुमचे काम वेळेवर पूर्ण होणार असून तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला पुढे जाण्यास मदत करणार आहे. पैशाच्या बाबतीत तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे. कुटुंबात काही वाद असल्यास शांततेने बोलून मिटवा. या आठवड्यात प्रवास टाळलेला बरा होईल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या वृद्ध व्यक्तीमुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शुभ दिवस: 25
या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांना पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. तुमच्या प्रकल्पांसाठी नवीन मार्ग खुले होणार आहे. तुम्हाला काही नवीन काम मिळणार आहे. जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबातील महिलेच्या मदतीने तुम्हाला सुख आणि समृद्धी लाभणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात काही यश मिळणार आहे. मात्र तुम्ही प्रवास टाळल्यास चांगले होईल. या आठवड्यात तुमचा खर्च वाढेल. तुम्ही कोणाशीही वाद घालण्याचे टाळाल तर ते तुमच्यासाठी चांगले राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी कोणालाही संदेश पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. शुभ दिवस: 23
या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन ऑफर मिळेल. तुमच्या प्रकल्पांबद्दल तुम्हाला खूप आराम मिळणार आहे. तुमच्या कामातून तुम्हाला समाधान मिळणार आहे. पैशाच्या बाबतीत काळ अनुकूल राहणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. या आठवड्यात तुमचे आरोग्य सुधारणार आहे. तुम्ही निरोगी राहणार आहे. कुटुंबात काही मुद्द्यावरून मतभेद होणार आहे. या आठवड्यात प्रवास करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुम्हाला एखाद्या महिलेबद्दल काळजी वाटणार आहे. शुभ दिवस: 24, 25
या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांना सन्मान मिळणार आहे. तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमच्या प्रकल्पांच्या यशाचा आनंद साजरा करणार आहे. या आठवड्यात तुमचा खर्च जास्त असणार आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या. भविष्याचा विचार करून पैशाचा वापर केल्यास फायदा होणार आहे. जर तुम्ही कोणाशीही एकत्र काम केले असेल तर तुम्हाला त्यात अडचणी येणार आहेत. कुटुंबात वाद होऊ शकतात. तुम्ही घराच्या नूतनीकरणावरही खर्च होणार आहे. या आठवड्यात तुम्ही प्रवास न केल्यास चांगले परिणाम मिळतील, पण तुम्हाला एखाद्या वृद्ध व्यक्तीची काळजी वाटणार आहे. शुभ दिवस: 25, 26
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा पैशाच्या बाबतीत चांगला असणार आहे. तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. तुम्ही काही नवीन व्यायाम किंवा योग वर्गात सहभागी होणार आहात. ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारणार आहे. या आठवड्यात प्रवास केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होईल. तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून तुमचे अंतर वाढणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणीही आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. तुमचे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास अडथळे येणार आहेत. कुटुंबात एकटेपणा जाणवेल. आठवड्याच्या शेवटी कोणाशीही वाद घालू नका तरच बरं होईल. शुभ दिवस: 26, 27
या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत प्रगती होणार आहे. तुम्हाला आर्थिक फायदा मिळणार आहे. तुमचे आरोग्य सुधारणार असून तुम्ही निरोगी राहणार आहात. प्रवासासाठी हा आठवडा चांगला नाही. प्रवास पुढे ढकललात तर बरे होईल. कुटुंबात परस्पर मतभेद होण्याची शक्यता आहे. याचे कारण आर्थिक अडचणी किंवा अन्य काही असू शकतं. तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम राहिल्यास शेवटी फायदाच होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही काही कायदेशीर प्रकरणात अडकू शकता. शुभ दिवस: 24, 25
या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकतं. पैशाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या मनाचे ऐकले तर चांगले परिणाम मिळतील. नोकरीच्या ठिकाणी काही प्रकल्पामुळे तुम्ही चिंतेत राहणार आहात. कुटुंबात तुम्ही दिलेली आश्वासने या आठवड्यात पूर्ण होताना दिसत नाहीत. तुम्ही कोणतीही योजना करत असाल तर त्यासाठी दुसरा पर्याय तयार ठेवा. या आठवड्यात प्रवास करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुमच्या कुटुंबातील एखाद्या वृद्ध सदस्याच्या बिघडलेल्या तब्येतीने तुम्ही चिंतेत असाल. प्रवास पुढे ढकललात तर बरे होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही वाईट बातमी मिळू शकते. शुभ दिवस: 24
या आठवड्यात धनु राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे. तुमचे प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहे. व्यवसायासाठी प्रवास करत असाल तर यश मिळणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाचा फायदा होईल. पैशाच्या बाबतीत जोखीम पत्करली तर फायदा होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही वाईट बातमी मिळू शकते. शुभ दिवस: 25, 27
या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना त्यांच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य लाभणार आहे. तुमच्या जीवनात सुख-समृद्धी नांदेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि तुम्हाला यश मिळेल. त्याच्या कामात निष्णात असलेल्या एखाद्या व्यक्तीचा सल्ला तुम्ही पाळला पाहिजे. महिला डॉक्टरांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. या आठवड्यात प्रवास करून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमचे प्रवास यशस्वी होणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थोडे आळसपणा जाणवणार आहे. शुभ दिवस: 23, 26, 27
या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत प्रगती घेऊन आला आहे. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी नवीन करण्याचा विचार करणार आहात. तुमचे प्रकल्प यशस्वी होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाचा फायदा लाभणार आहे. तुमचा प्रवास सुखकर होईल. या आठवड्यात तुमचा खर्च वाढू शकतो. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष दिले पाहिजे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल. शुभ दिवस: 24, 25, 26
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा पैशाच्या बाबतीत चांगला असणार आहे. तुम्हाला आर्थिक फायदा मिळणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला पैशाशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. तुमच्या नात्यात प्रेम वाढणार आहे. महिलेच्या मदतीने तुमचे आरोग्य सुधारणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित करणार आहात. प्रवासामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. प्रवास पुढे ढकललात तर बरे होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही पार्टी करण्याच्या मूडमध्ये असाल. शुभ दिवस: 26, 27 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)