Weekly Horoscope 28 July to 3 August 2025 in Marathi : श्रावणाचा पहिल्या आठवड्यात बुधादित्य योग अतिशय शुभ संयोग घेऊन आला आहे. बुधादित्य राजयोगामुळे काही राशीची लोकांना मोठं आर्थिक फायदा मिळणार आहे. कौटुंबिक जीवनातही आनंद असणार असून कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा प्राप्त होणार आहे. एकंदरीत हा आठवडा 12 राशी मेष ते मीन राशीसाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत शुभ सिद्ध होणार आहे. धनवृद्धीचे शुभ संयोग निर्माण होणार आहे. व्यवसायाच्या बाबतीत, तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक नवीन संधी मिळणार आहे. पण सहली पुढे ढकलणे तुमच्यासाठी चांगले राहणार आहे. कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवणार आहेत. ज्यामुळे मन अस्वस्थ राहणार आहे. जर आरोग्य चांगले नव्हते तर आता आरोग्यात बरीच सुधारणा पाहिला मिळणार आहे. चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. कामाच्या ठिकाणीही समस्या वाढणार आहे. तसंच तुमचे मन अस्वस्थ राहणार आहे.
या आठवड्यात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहे. हळूहळू तुमचे प्रकल्प यशाकडे वाटचाल करणार आहे. आर्थिक बाबींमध्येही सुधारणा पाहिला मिळणार आहे. पण तुम्हाला हळूहळू यश प्राप्त होणार आहे. प्रवासाद्वारे व्यवसायातही यश मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. या आठवड्यात तुमच्या आरोग्यात बरीच सुधारणा दिसून येणार आहे. पण, कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला एकटेपणा जाणवेल. आठवड्याच्या शेवटी, तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीचे शुभ संयोग निर्माण होणार आहे.
तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश प्राप्त होणार आहे. आयुष्यात आनंद आणि समृद्धी नांदणार आहे. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांबद्दल आणि कामाच्या ठिकाणी प्रकल्पाबद्दल गंभीर राहणार आहात. यामुळे सकारात्मक आणि ठोस निर्णय घ्यावे लागणार आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे. तुम्ही हळूहळू पैशाच्या कमतरतेपासून मुक्त होणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण असणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते मजबूत होणार आहे. पण आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला अचानक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.
या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामात प्रगती करणार आहात. तुमचा आदरही वाढणार आहे. तुमच्या कामात तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीची मदत मिळणार आहे. ज्यामुळे तुम्हाला यश मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे. नवीन गुंतवणुकीद्वारे तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. प्रवासाद्वारे तुम्हाला व्यवसायात यश मिळणार आहे. कुटुंबातील मुलांशी संबंधित कोणतीही बातमी तुमचा आठवडा आणखी चांगला करणार आहे. पण आठवड्याच्या शेवटी, काही कारणास्तव तुमचे मन अस्वस्थ राहणार आहे.
व्यवसायाच्या सहलीवर गेल्याने तुम्हाला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. तुमच्या क्षेत्रात प्रगती पाहिला मिळणार आहे. पण आर्थिक बाबतीत थोडा कठीण काळ येणार आहे. अशा परिस्थितीत, निष्काळजीपणामुळे खर्च वाढणार आहे. पैशाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टीने, या आठवड्यात सहली पुढे ढकलणे तुमच्यासाठी चांगले राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही कामात अधिक व्यस्त राहणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. ज्यामुळे मन आनंदी राहणार आहे.
कामाच्या ठिकाणी हळूहळू प्रगती पाहिला मिळणार आहे. कठोर परिश्रम करून तुम्ही आयुष्यात यश मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधकांच्या योजना तुमच्याविरुद्ध अपयशी ठरणार आहे. आर्थिक बाबतीत आठवडा सामान्य राहणार आहे. पण काही गुंतवणुकीमुळे मन अस्वस्थ राहणार आहे. तुम्ही व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना देखील आखणार आहात. ज्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी नांदणार आहे. कुटुंबात शांती राहणार आहे. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांच्या जीवनात रोमान्स वाढणार आहे.
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामात प्रगतीची शुभ संकेत मिळणार आहे. सर्जनशील कामातून तुम्हाला विशेष यश मिळणार आहे. आर्थिक बाबींमध्ये हळूहळू सुधारणा पाहिला मिळणार आहे. तुम्हाला पैसे प्राप्त होणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून तुम्हाला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही नेटवर्किंगद्वारे नफा कमवणार आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या आशीर्वादाने, जीवनात आनंद आणि समृद्धी प्राप्त होणार आहे. परस्पर प्रेम देखील वाढणार आहे.
कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिला मिळणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रकल्पाशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखून पुढे जाण्याने, संपत्ती वाढीच्या शुभ शक्यता निर्माण होणार आहे. व्यावसायिक प्रवासातून सामान्य यश मिळणार आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही त्या पुढे ढकलल्या तरी कोणतीही समस्या येणार नाही. आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. कुटुंबातील परस्पर प्रेम दृढ होणार आहे. तसंच, तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे.
हा आठवडा तुमच्यासाठी मिश्रित असणार आहे. आर्थिक बाबतीत, आठवड्याच्या मध्यात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. व्यवसायाच्या बाबतीत, या आठवड्यात प्रवास पुढे ढकलणे तुमच्यासाठी चांगले राहणार आहे. अन्यथा काही समस्या उद्भवणार आहे. पण आठवड्याच्या शेवटी, परिस्थिती सुधारणार आहे. तुम्हाला जीवनात यश मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडूनही पूर्ण पाठिंबा प्राप्त होणार आहे. तुमचे प्रेम जीवन रोमँटिक असणार आहे.
या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिला मिळणार आहे. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण पाठिंबा देणार आहेत. व्यवसायाच्या बाबतीत, तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून प्रकल्प पूर्ण करण्यात मदत मिळणार आहे. आर्थिक बाबतीत संपत्ती वाढ होणार आहे. गुंतवणूकदारांकडून तुम्हाला मोठा नफा मिळणार आहे. तसंच, तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळणार आहे. कामाच्या संदर्भात प्रवास केल्याने देखील आनंददायी परिणाम मिळणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या हळूहळू दूर होणार आहेत. जीवनात आनंद असणार आहे.
हा आठवडा आर्थिक बाबींसाठी शुभ असणार आहे. तुमच्या संपत्तीतही वाढ पाहिला मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही समाधानी आणि आरामदायी राहणार आहात. या आठवड्यात कामाशी संबंधित सहलींवर जाण्यापूर्वी तुमचे सर्व कागदपत्रे नीट तपासून घ्या. अन्यथा आर्थिक बाबींमध्ये समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी, कामाच्या ठिकाणी आदर वाढणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये परस्पर प्रेम वाढणार असून तुम्हाला जीवनात शांती राहणार आहे.
आर्थिक बाबींमध्ये अडकलेले पैसे आता तुम्हाला परत मिळणार आहे. जर कोणतेही न्यायालयीन प्रकरण अडकले असेल तर ते आता तुम्हाला अनुकूल निकाल देणार आहेत. तसंच, आर्थिक लाभाचे संकेत मिळणार आहेत. या आठवड्यात केलेल्या प्रवासात तुम्हाला यश देखील मिळणार आहे. त्यांच्या मदतीने जीवनात आनंद आणि समृद्धीचे नवीन मार्ग उघडणार आहेत. पण कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात होण्याची चिंता मनाला लागणार आहे. पण आठवड्याच्या शेवटी, एखाद्या महिलेमुळे तुम्हाला आराम मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंद असणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)