Weekly Horoscope 30 June to 6 July 2025 in Marathi : जुलै म्हणजे आषाढ महिन्याचा पहिला आठवड्यात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. खरंतर या आठवड्यात संपत्तीचा कारक शुक्र वृषभ राशीत गोचर करणार आहे. या योगामुळे मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग प्रगती आणि आर्थिकबाबतीत फायदेशीर मानला गेला आहे. व्यावसायिकांसाठी तो लाभदायक आहे. असा हा राजयोग 5 राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक मानला गेला आहे. असा हा जुलैचा पहिला आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घेऊयात आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून...
या राशीच्या लोकांसाठी जुलैचा पहिला आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगतीची असणार आहे. तुमची सक्रियता आणि वचनबद्धता फळी लागणार आहे. वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होणार आहे. जुन्या रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार आहे. जर तुम्ही भागीदारीत असाल तर अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा शुभ राहणार आहे. कुठूनतरी अचानक पैसे तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर जमीन किंवा कायमस्वरूपी मालमत्तेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची चिंता असणार आहे. या आठवड्यात प्रवास योजना पुढे ढकलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मानसिक थकवा आणि खर्च या आठवड्यात वाढणार आहे. आरोग्य सामान्य राहणार आहे. पण आहारात संतुलन राखणे आवश्यक असणार आहे. तुम्हाला मोठे आर्थिक फायदे या आठवड्यात मिळणार आहे. शुभ दिवस : 30, 2, 4
या राशीच्या लोकांसाठी जुलैचा पहिला आठवडा नफा आणि प्रगतीने भरलेला असणार आहे. या आठवड्यात सातत्य आणि समर्पण तुम्हाला कामाच्या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहे. तुम्हाला हळूहळू तुमच्या कामात यश मिळणार आहे. पण सुरुवातीला काही अडथळे येण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे. तुम्हाला तुमच्या मागील मेहनतीचे फळ मिळणार आहे. पण, सध्या कोणतीही धोकादायक गुंतवणूक या आठवड्यात करु नका. पैशांबाबत आणि कौटुंबिक बाबींबाबत, विशेषतः मुलांशी संबंधित किंवा घरगुती जबाबदाऱ्यांबाबत कोणताही गंभीर निर्णय तुम्हाला घ्यावे लागणार आहे. तुम्हाला आरोग्यात सुधारणा दिसणार आहे. पण आधीच सुरू असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास अनावश्यक असेल, त्यामुळे तो पुढे ढकलणे हिताचे ठरेल. विचार न करता कोणतेही काम या आठवड्यात घेऊ नका. शुभ दिवस: 30, 2, 4
या राशीच्या लोकांसाठी जुलैच्या पहिला आठवडा कामाच्या ठिकाणी मिश्र परिणामाचा असणार आहे. भागीदारीत तुम्हाला नुकसान सहन करावे लागणार आहे. म्हणून व्यवसायात काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहे. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तणावपूर्ण राहणार आहे. विशेषतः निष्काळजीपणामुळे अनावश्यक खर्च होणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला काही लोकांच्या मनोरंजनावर पैसे खर्च करावे लागणार आहे. तुमचे बजेट थोडे बिघडण्याची शक्यता आहे. पण आर्थिकदृष्ट्या खर्च करण्याची तुमची सवय तुम्हाला पुन्हा संतुलित करणार आहे कामाच्या ठिकाणी मानसिक दबाव राहणार आहे. चांगल्या संवादाने मतभेद दूर होणार आहे. कौटुंबिक जीवनात महिला सदस्याबद्दल चिंता राहणार आहे. आठवड्याचा मध्य प्रवासासाठी अनुकूल राहणार आहे. पण तो सुरक्षित असणार आहे. शुभ दिवस : 3, 4
आर्थिक बाबतीत या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहणार आहे. गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होणार आहे. कामाच्या ठिकाणी अचानक आलेली जबाबदारी तुम्हाला प्रतिष्ठा देणार आहे. हे केल्याने तुम्हाला फायदा होणार असून तुमच्या आयुष्यात प्रगती होणार आहे. परस्पर संवाद आणि समजुतीने सर्व काही ठीक होणार आहे. आठवड्याच्या शेवटी नात्यांमध्ये गोडवा परत येणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती नांदणार आहे. आरोग्य सुधारणा तुम्हाला पाहिला मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात प्रगती होणार आहे. मानसिक थकव्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रवास फायदेशीर ठरणार असून विशेषतः व्यावसायिक बाबींमध्ये, तुमच्यासाठी प्रगतीत दिसणार आहे. व्यवसायात तुम्हाला पैसे आणि सन्मानाचे विशेष फायदे मिळण्याची अपेक्षा वाढणार आहे. शुभ दिवस : 30, 1, 3
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत प्रगतीने भरलेला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असणार आहे. कामाच्या ठिकाणी असहयोगी वातावरणामुळे ताण वाढणार आहे. म्हणून अहंकारापासून दूर राहणे तुमच्यासाठी हिताच ठरेल. आर्थिक दृष्टिकोनातून परिस्थिती संतुलित राहणार आहे. पण अतिरिक्त फायद्यांसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. कुटुंबातील एखाद्या तरुण सदस्याबद्दल तुम्ही चिंतेत राहणार आहात. त्याच्या करिअरशी संबंधित काही कामात मदत करण्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागणार आहे. तुम्हाला आरोग्यात कमकुवत किंवा थकवा जाणवणार आहे, पुरेशी विश्रांती तुम्हाला या आठवड्यात घ्यावी लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी जवळच्या ठिकाणी सहल आरामदायी असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला कुठेतरी बाहेर जावे लागणार आहे. शुभ दिवस : 2, 6
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा पैशाच्या आणि करिअरच्या बाबतीत मिश्रित असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी दोन पर्याय मिळणार आहेत. दोन्ही फायदेशीर वाटणार आहे पण एकावर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहे. आर्थिक बाबींमध्ये खर्च वाढणार आहे. विशेषतः लहान मुलांवर हुशारीने गुंतवणूक करा. प्रेमसंबंधात गोडवा राहणार आहे. पण प्रणय अपेक्षेपेक्षा थोडा कमी असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या जोडीदारासोबत प्रवास किंवा भेटवस्तूंची देवाणघेवाण केल्याने संबंध सुधारणार आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहे. पण तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पूर्ण करणार आहात. आरोग्य स्थिर राहणार असून पण झोपेचा अभाव चिडचिडेपणा निर्माण करणार आहे. शुभ दिवस : 1, 2, 3
या राशीच्या लोकांसाठी, हा आठवडा कामाच्या ठिकाणी विस्तार आणि विकासाचे मजबूत संकेत देणारा ठरणार आहे. विशेषतः भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा प्रकल्प प्राप्त होणार आहे. पण जुना करार अंतिम असणार आहे. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा काळ फायदेशीर राहणार आहे. विशेषतः दीर्घकालीन गुंतवणूक किंवा स्थिर मालमत्तेत, तुम्हाला नफा मिळणार आहे. परदेशी संपर्कातून पैसे येण्याची शक्यता देखील आहे. आठवड्याच्या मध्यात, काही सरकारी कागदपत्रे किंवा कागदपत्रे फायदेशीर ठरू शकतात. व्यावसायिक प्रवासाद्वारे नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. सहकाऱ्याशी मतभेद होण्याची शक्यता असली तरी, तुम्ही तुमच्या संयमाने आणि धोरणात्मक विचारसरणीने परिस्थिती हाताळाल. आठवडा गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे, पण तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच निर्णय घेणं हिताचे ठरणार आहे. शेअर बाजार, ट्रेडिंग किंवा क्रिप्टोमध्ये आधीच केलेली गुंतवणूक आता नफा देणार आहे. व्यावसायिक भागीदारांसोबत पारदर्शकता ठेवा अन्यथा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी उत्पन्न स्थिर राहणार आहे. तुम्हाला व्यवसायात मोठा नफा मिळणार आहे. आर्थिक बाबींमध्ये मोठा फायदा मिळणार आहे. शुभ दिवस : 2, 3
या राशीच्या लोकांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन भूमिका मिळण्याची शक्यता आहे. किंवा बदली आणि पदोन्नतीचे संकेत देखील मिळत आहेत. जर तुम्ही व्यवसायात असाल तर तुम्ही तुमच्या उत्पादनाचे किंवा सेवेचे बाजारात ब्रँडिंग करण्यावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरणार आहे. याद्वारे आर्थिक वाढ होणार आहे. कोणतेही प्रलंबित पेमेंट तुम्हाला मिळणार आहे. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून, हा आठवडा रिअल इस्टेट किंवा म्युच्युअल फंडसाठी चांगला राहणार आहे. जर तुम्ही स्टार्टअपची योजना आखत असाल तर आतापासूनच नियोजन सुरू करणार आहात. आठवड्याच्या शेवटी, वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेण्यास मदत होणार आहे. तुम्हाला व्यवसायात मोठा नफा होणार आहे. अचानक तुम्हाला एकाच वेळी मोठी रक्कम मिळणार आहे. शुभ दिवस : 4, 5
हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ संकेत घेऊन आला आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य मिळणार आहे. ज्यामुळे तुमची भूमिका मजबूत होणार आहे. व्यवसायात नफा मिळणार आहे. विशेषतः जर तुम्ही बांधकाम, अभियांत्रिकी किंवा कृषी आधारित क्षेत्रात असाल तर तुम्हाला फायदा होणार आहे. हा आठवडा गुंतवणुकीसाठी अनुकूल असणार आहे. पण ज्या योजना पूर्वी स्थिर परतावा देत आहेत अशाच योजना तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही वाहन किंवा घरगुती वस्तूंसारख्या मोठ्या खर्चाची योजना आखणार आहे. बँकिंग आणि वित्त क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा विशेष प्रगती होणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही काही नवीन योजनांवर काम सुरू करणार आहात. शुभ दिवस : 3, 6
या राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा आठवडा नवीन संधी घेऊन आला आहे. या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. पण त्याचा तुमच्या प्रतिष्ठेवर आणि उत्पन्नावर सकारात्मक परिणाम पाहिला मिळणार आहे. भागीदारीत चालणाऱ्या व्यवसायात विश्वासाचे वातावरण ठेवल्या, तरच तुम्हाला अपेक्षित नफा मिळणार आहे. जर तुम्ही आधीच मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखली असेल, तर ती अंमलात आणण्याची ही वेळ असणार आहे. आठवड्याच्या मध्यभागी प्रवास घडणार आहे. जी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरणार आहे. जुन्या संपर्कातून तुम्हाला पुन्हा व्यवसाय प्रस्ताव मिळणार आहे. त्याकडे लक्ष देणे फायदेशीर ठरणार आहे. तुमचा आदरही वाढणार आहे. शुभ दिवस : 2, 4, 5
या राशीच्या लोकांसाठी, हा आठवडा काम आणि वित्त दोन्हीमध्ये हालचाल आणि बदल घडविणारा असणार आहे. जर तुम्ही लेखन, कला, डिझाइन किंवा माध्यम यासारख्या सर्जनशील क्षेत्रात असाल तर तुम्हाला एक नवीन संधी मिळणार आहे. ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढणार आहे. गुंतवणुकीबद्दल थोडे सावधगिरी बाळगावी लागणार आहे. विशेषतः अल्पकालीन योजनांमध्ये तुम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे. वरिष्ठांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायात, जुन्या क्लायंटसोबत करार होणार आहे. आठवड्याच्या शेवटी पेमेंट डील होणार आहे. ज्यामुळे तुमची रोख स्थिती सुधारणार आहे. तुमच्या कारकिर्दीत अचानक तुम्हाला मोठी ऑफर मिळणार आहे. शुभ दिवस: 3, 6 (Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)