PHOTOS

Weekly Money Horoscope : बुध गोचरमुळे 'या' राशींवर धनवर्षाव, जाणून घ्या सर्व 12 राशींचं साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

Weekly Money Horoscope 05 June to 11 June 2023 : येत्या 7 जूनला बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरमुळे सर्व राशींवर परिणाम आहे. जाणून घ्या आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे. 

Advertisement
1/13
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

7 जून 2023 रोजी बुध हा वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध हा आर्थिक स्थिती परिणाम करणारा ठरतो. त्यामुळे हा आठवडा अनेक राशींसाठी धनलाभ घेऊन आला आहे. 

2/13
मेष (Aries)
मेष (Aries)

हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी खर्चिक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. या आठवड्यात प्रवासचे योग आहेत. घरातील व्यक्तीच्या आरोग्यासाठी खर्च होईल. प्रवासातून नवीन ओळख होईल. आठवड्याच्या शेवटी जरा बिझी बिझी असणार आहात.

3/13
वृषभ (Taurus)
वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली ठरणार आहे. बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नवीन गुंतवणुकीसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. या गुंतवणुकीतून भविष्यात मोठा फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रातही तुमचं नाव गाजणार आहे. 

4/13
मिथुन (Gemini)
मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भरभराहट घेऊन आला आहे. आतापर्यंत केलेल्या कामाचं फळ तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभाचे योग आहे. कुटुंबात सुख-समृद्धीचे सुंदर योग जुळून आले आहेत. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. 

5/13
कर्क (Cancer)
कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकृष्ट्या अतिशय चांगला ठरणार आहे.  बँक बॅलेन्समध्ये तगडी वाढ होणार आहे. प्रवासाचे योग आहेत. मात्र कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. या आठवड्यात कुटुंबातील सदस्य तुमच्यावर वर्चस्व गाजवतील. 

6/13
सिंह (Leo)
सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या शुभ ठरणार आहे.  कामाच्या ठिकाणी प्रगतीसोबत मान सन्मान वाढणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आबे. प्रवासादरम्यान काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी मन कुठल्या तरी कारणाने उदास राहिल. 

7/13
कन्या (Virgo)
कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला स्त्रीची मदत होईल. कुटुंबात बदल घडणार आहेत. आरोग्याकडे लक्ष द्या. प्रवासातून अडचणीचा सामना करावा लागू शकतो. 

 

8/13
तूळ (Libra)
तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रसन्न ठरणार आहे. मात्र आर्थिक प्रगतीसाठी कष्ट करावे लागणार आहेत. कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ते नीट वाचा, नाही तर आर्थिक फटका बसू शकतो. आरोग्याबद्दल सकारात्मक परिणाम दिसणार आहेत.

9/13
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदादायी ठरणार आहे. अनेक महिन्यांपासून अडकलेले पैसे परत मिळणार आबे. त्यामुळे तुमची आर्थिकस्थिती मजबूत होणार आहे. प्रवासाचे योग आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. सुख समृद्धीचे शुभ योग जुळून आले आहेत. 

10/13
धनु (Sagittarius)
धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांना हा आठवडा आर्थिक प्रगतीचा ठरणार आहे. या लोकांच्या नशिबात शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणाहून लाभ होणार आहे. आरोग्याचे प्रश्न मिटणार आहे. कुटुंबात मात्र थोडा तणाव राहिल. अन्यथा हा आठवडा तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे. 

11/13
मकर (Capricorn)
मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या शुभ ठरणार आहे. त्याची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. आरोग्याच्या समस्या सुटणार आहेत. कुटुंबातही आनंदाचं वातावरण असणार आहे. मात्र या आठवड्यात तुम्ही प्रवास टाळलेला चांगला ठरणार आहे. 

12/13
कुंभ (Aquarius)
कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असणार आहे. आर्थिक बाबतीत चढ उतार दिसणार आहे. मात्र आठवड्याच्या शेवटी परिस्थिती बदलेल. आरोग्यात सुधारणा होणार आहे, त्यामुळे मन प्रसन्न राहिल. कुटुंबात काही बाबत गोष्टी तुमच्या बाजूने घडतील. कामाच्या ठिकाणी प्रगतीचा चढा प्रवास असणार आहे. 

13/13
मीन (Pisces)
मीन (Pisces)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात होणाऱ्या प्रवासातून आर्थिक फायदा होणार आहे. कुटुंबात शुभ कार्य ठरणार आहे. घरासाठी खरेदी करणार आहात. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी अपार संपत्ती घेऊन येणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे, त्यामुळे या काळात गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी मन उदास असेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला गूड न्यूज मिळणार आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More