PHOTOS

Weekly Numerology :'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी कसा असेल हा बुद्ध पौर्णिमेचा आठवडा? 'या' लोकांना मिळणार धनलाभ

Saptahik Ank Jyotish 12 to 18 may 2025 2025 : अंकशास्त्राच्या गणनेनुसार बुद्ध पौर्णिमेपासून सुरु झालेल्या हा आठवडा जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 12 ते 18 मे हा आठवडा 4, 5 आणि 8 या अंकांसाठी उत्तम राहणार आहे. या अंकाचे लोक अनेक आव्हानांवर मात करणार असून यश प्राप्त करणार आहात. जन्मतारखेनुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व अंकांसाठी हा आठवडा किती फायदेशीर राहील जाणून घ्या. 

Advertisement
1/9
मूलांक 1
मूलांक 1

या आठवडा विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास आनंद प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कायदेशीर बाबींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अन्यथा तुमचे नुकसान होईल. तुमच्या कामाबद्दल तुम्हाला एकटेपणा जाणवणार आहे. अहंकारामुळे प्रेमसंबंधांमध्ये भांडणे होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी आनंद आणि यश तुमच्या दारी येणार आहे. पैशांशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा.

2/9
मूलांक 2
मूलांक 2

या आठवड्यात प्रेम, आर्थिक बाबी आणि करिअरमध्ये बदल घडविणारा असणार आहे. प्रेमसंबंध दृढ होणार आहे. आर्थिक निर्णय सुज्ञपणे घेतल्यास तुम्हाला फायदा मिळणार आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला थोडे एकटे वाटणार आहे. आठवड्याच्या अखेरीस जीवनात अनेक बदल दिसून येणार आहे. तुम्ही एका नवीन मार्गाने पुढे जाणार आहात. या आठवड्यात प्रेम जीवनात आनंदाचे संकेत मिळणार आहेत. तुमच्या नात्यात प्रेम आणखी वाढणार होणार आहे. आर्थिक बाबींमध्ये शहाणपणाने वागणे फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेतले तर तुम्हाला चांगले परिणाम प्राप्त होईल. 

3/9
मूलांक 3
मूलांक 3

या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये हुशारीने गुंतवणूक करा. भविष्य लक्षात ठेवून घेतलेले निर्णय तुमच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होमार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक वाढीचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणीही प्रगती होणार आहे. भागीदारीत केलेले काम तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. या आठवड्यात तुमच्या प्रकल्पाच्या यशाने तुम्हाला दिलासा मिळणार आहे. 

4/9
मूलांक 4
मूलांक 4

या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिला मिळेल. जर तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानाचे अनुसरण करून प्रकल्पासाठी निर्णय घेतले तर तुम्ही यशस्वी प्राप्त होईल. अपेक्षेपेक्षा कमी असले तरी आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. प्रेमसंबंधात तुम्हाला भेटवस्तू मिळतील. प्रेम जीवनात प्रणय हळूहळू दार ठोठावणार आहे. आठवड्याच्या शेवटी, जीवन चांगले बनवण्यासाठी काही जोखीम पत्करावी लागणार आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळणार आहे. तुमच्या अंतर्ज्ञानाचा म्हणजेच तुमच्या आतल्या आवाजाचा आवाज ऐकून तुमच्या प्रकल्पासाठी निर्णय घ्यावा लागणार आहे. 

5/9
मूलांक 5
मूलांक 5

हा आठवडा तुमच्या करिअर आणि आर्थिक परिस्थितीसाठी चांगला असणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवास करणे फायदेशीर ठरणार आहे. प्रवासादरम्यान तुम्हाला कोणी खास व्यक्ती भेटणार आहे. ही व्यक्ती भविष्यात तुम्हाला साथ देणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमचे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात. आर्थिक बाबींमध्ये नवीन गुंतवणूक करणे शुभ राहणार आहे. यामुळे तुमची संपत्ती वाढणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. आठवड्याच्या शेवटी कोणतेही मोठे निर्णय घेण्याचे टाळा.

 

6/9
मूलांक 6
मूलांक 6

या आठवड्यात आर्थिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी प्राप्त होणार आहे. गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राखणे उचित राहणार आहे. कामाच्या ठिकाणी घाईघाईने निर्णय घेणे टाळा. आठवड्याच्या शेवटी विचारपूर्वक निर्णय घेणे चांगले राहणार आहे. संयम बाळगल्याने अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. आर्थिक आणि प्रेम संबंधांसाठी हा आठवडा महत्त्वाचा राहणार आहे. या आठवड्यात तुम्हाला सहलीला जाण्याची संधी मिळणार आहे. 

7/9
मूलांक 7
मूलांक 7

या आठवड्यात तुमच्या आयुष्यात चढ-उतार पाहिला मिळतील. तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहे. कामात हळूहळू प्रगती होणार असून प्रकल्प वेळेवर पूर्ण होणार आहे. प्रेमसंबंधात मन उदास राहू शकते. या आठवड्यात खर्चही वाढू शकतो, म्हणून गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल, मात्र काही चिंता तुमच्या मनात राहतील. हा आठवडा तुमच्यासाठी गोड आणि आंबट अनुभवांचे मिश्रण घेऊन येत आहे. म्हणून, प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. जर तुम्ही संयम राखलात तर ते तुमच्यासाठी चांगले असेल.

8/9
मूलांक 8
मूलांक 8

या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे. तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो. आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती सुधारेल आणि मन प्रसन्न राहील. या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. याचा अर्थ, तुमच्या कारकिर्दीत प्रगती असणार आहे. तुम्ही कदाचित नवीन नोकरी सुरू कराल.

9/9
मूलांक 9
मूलांक 9

हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी जितके विचारपूर्वक काम कराल तितके जास्त यश तुम्हाला मिळणार आहे. पैशाच्या बाबतीतही फायदा होणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला पैशांबाबत काही चांगली बातमी मिळणार आहे. प्रेमाच्या बाबतीतही सर्व काही ठीक राहणार आहे. तुमचे नाते अधिक घट्ट होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नवीन ठिकाणी राहण्याचा विचार करणार आहात. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला इच्छित बदलांसाठी थोडा जास्त वेळ वाट पहावी लागणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.) 





Read More