PHOTOS

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेची लोक होणार श्रीमंत! 1 ते 9 मूलांकासाठी कसा असेल हा आठवडा?

Saptahik Ank Jyotish 4 to 10 August 2025 in Marathi : अंकशास्त्र गणनेनुसार 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2025 या आठवड्यात मूलांक 1, 3 आणि 9 असलेल्या लोकांना आर्थिक बाबतीत खूप फायदा ठरणार आहे. त्यांच्या संपत्तीतही वाढ होणार असून आयुष्यात आनंद आणि समृद्धी नांदणार आहे.  प्रेम जीवनात खूप आनंद राहणार असून जोडीदारासोबतचे प्रेम अधिक दृढ होणार आहे. त्यांना व्यवसायात दुप्पट प्रगती मिळणार आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. त्याच वेळी, मूलांक 2 आणि 4 असलेल्या लोकांनी या आठवड्यात काळजीपूर्वक निर्णय घ्यावे. कोणतेही काम संयमाने करा. जन्मतारखेनुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व मूलांक लोकांसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या अंकशास्त्र तज्ज्ञ कविता ओझा यांच्याकडून 

Advertisement
1/9
मूलांक 1
मूलांक 1

कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिला मिळणार असून कामाशी संबंधित जुने रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे तुम्ही जीवनात यशाच्या मार्गावर पुढे जाणार आहात. आर्थिक बाबतीतही शुभ प्रगती होणार असून ज्यामुळे संपत्ती वाढ होणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून आणि प्रियजनांकडून मदत मिळणार आहे. प्रेमसंबंधही सुधारणा पाहिला मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला जीवनात शांती अनुभवायला मिळणार आहे. तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत असणार आहे. पण तुमच्यासाठी आनंद आणि समृद्धीचे मार्ग उघडत राहणार आहे. 

 

2/9
मूलांक 2
मूलांक 2

तुमच्या प्रेम जीवनात शांती राहणार आहे. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला अधिक प्रभावित करणार आहात. आर्थिक बाबींमध्ये तणाव वाढणार आहे. ज्यामुळे तुम्ही अचानक जास्त पैसे खर्च करणमार आहात. व्यवसायाच्या बाबतीत, तुम्हाला संयमाने काम करावे लागणार आहे. अन्यथा तुमचे नुकसान होणार आहे. व्यवहारी राहून तुम्ही सर्वात कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडणार आहे. या आठवड्याच्या शेवटी, तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येणार आहे. तुम्हाला नवीन संधी देखील मिळणार आहे. 

3/9
मूलांक 3
मूलांक 3

आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी संपत्ती वाढणार आहे. ज्यामुळे जीवनात शांती येणार आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक झाल्यामुळे मन उत्साहित राहणार आहे. त्यातून पैसे येण्याचीही चांगली संधी मिळणार आहे. हळूहळू कामाच्या ठिकाणी प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. तुमचे महत्त्वाचे प्रकल्पही वेळेवर पूर्ण होणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला प्रेमसंबंधात काही समस्या येणार आहे. पण कालांतराने, प्रेम जीवन चांगले होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याची प्लन करणार आहात. आठवड्याच्या शेवटी भावनिकदृष्ट्या वेळ थोडा कठीण जाणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला संतुलन राखावे लागणार आहे. 

4/9
​मूलांक 4
​मूलांक 4

कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही समस्या येणार आहेत. पण संभाषणाद्वारे परिस्थिती हाताळणे फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायाच्या बाबतीत संयमाने निर्णय घेणे आवश्यक असणार आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. प्रेम जीवनात लगेच कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा मोठी समस्या उद्भवू शकते. परस्पर मतभेद देखील वाढणार आहे. या आठवड्यात आर्थिक बाबींमध्ये खर्च वाढणार आहे. पण आठवड्याच्या शेवटी, परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होणार आहे. एक विशेष व्यक्ती तुमची मदत करणार आहे. 

5/9
मूलांक 5
मूलांक 5

हा आठवडा आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. संपत्ती वाढण्याचे शुभ योग असणार आहे. गुंतवणुकीशी भावनिक जोड जाणवणार आहे. त्यामुळे पैशाची आवक वाढणार आहे. कुटुंबात वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद असणार आहे. जीवनात आनंद आणि शांती असणार आहे. हळूहळू कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारणार आहे. प्रकल्प वेळेवर पूर्ण होणार आहे. प्रेम जीवनात शांती राहणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. पण तुम्हाला कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणा टाळावा लागणार आहे. अन्यथा नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या आयुष्यातील कोणताही निर्णय संयमाने घेणे तुमच्यासाठी चांगले ठरणार आहे. 

6/9
मूलांक 6
मूलांक 6

कामाच्या बाबतीत, तुम्ही काळजीपूर्वक विचार करून कोणताही निर्णय घ्या. जीवनात योग्य दिशा मिळविण्यासाठी, तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे. व्यवहारी राहिल्याने परिस्थिती सुधारणार आहे. प्रेम जीवनात, काही बातम्यांमुळे तुम्हाला दुःख वाटणार आहे. तसंच, जोडीदाराशी मतभेद वाढणार आहे. आर्थिक बाबींमध्ये खर्च होणार आहे. म्हणून अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळणे हिताचे ठरेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एकटेपणा जाणवणार आहे. त्याच वेळी, आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारणार असून तुम्ही जीवनात व्यस्त असणार आहात. 

7/9
मूलांक 7
मूलांक 7

प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जोडीदाराशी परस्पर प्रेम वाढणार असून समन्वय राहणार आहे. आर्थिक बाबींमध्ये हळूहळू प्रगती होणार आहे. आर्थिक लाभ होण्याचीही चांगली शक्यता असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. बॉसमुळे तणाव वाढणार आहे. व्यवसायाच्या बाबतीत हुशारीने निर्णय घ्या, अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

8/9
मूलांक 8
मूलांक 8

या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात आनंद येणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत प्रेम वाढणार आहे. तसंच, परस्पर समन्वयही राहणार आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहणार आहे. पण एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार केल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होणार आहे. यामुळे ताणतणाव वाढणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला नफा मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागणार आहे. तरच आर्थिक लाभ होणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहणार आहे आणि जीवनात उत्साह असेल. 

 

9/9
मूलांक 9
मूलांक 9

कामाच्या ठिकाणी प्रगती या आठवड्यात पाहिला मिळणार आहे. आयुष्यात आनंद आणि समृद्धीची शक्यता वाढणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रकल्पाशी संबंधित काही चांगल्या बातम्या कानावर पडणार आहे. आर्थिक बाबींमध्येही प्रगती होणार आहे. पैशाशी संबंधित प्रवास आर्थिक लाभ देणारी ठरणार आहे. व्यवसायात पैसे गुंतवल्याने तुम्हाला नफा मिळविण्याच्या नवीन संधी मिळणार आहे. प्रेम जीवनात दिलेली वचने पूर्ण करण्यास वेळ लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी, जीवनात सुसंगतता राखण्यासाठी तुम्हाला संभाषणाद्वारे परिस्थिती सुधारणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)  





Read More