Saptahik Ank jyotish 6 to 12 january 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार जानेवारीचा दुसरा आठवडा 6 ते 12 जानेवारीपर्यंत अनेक योगांचा शुभ संयोग घेऊन आलाय. अंकशास्त्राच्या गणनेनुसार, नवीन वर्ष 2025 ची मूळ संख्या 9 आहे. मंगळ हा मूलांक 9व्या क्रमांकाचा स्वामी आहे, त्यामुळे या वर्षभर ज्योतिषशास्त्रावर मंगळाचा प्रभाव राहणार आहे. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. जन्मतारीखानुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व मूलांकांसाठी 6 ते 12 जानेवारी 2025 चा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अहंकार टाळल्यास तुम्हाला लाभ होईल. संयम ठेवल्यास फायदा मिळणार आहे. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होणार असून आर्थिक लाभ होणार. नवीन प्रेमसंबंधांबाबत मन अस्वस्थ राहणार आहे. संवादाद्वारे समस्या सोडवणे तुमच्या हिताचे ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी अहंकाराचा संघर्ष होण्याचे संकेत आहे. त्यामुळे संयम बाळगणे महत्त्वाचे असणार आहे. आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होणार आहे. प्रेम प्रकरणांमध्ये नवीन सुरुवातीबद्दल मनात अशांतता राहणार आहे.
या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी प्रगती आणि मान वाढणार आहे. सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित चांगली बातमी कानावर पडणार आहे. पैशाच्या बाबतीत हळूहळू सुधारणा तुम्हाला दिसणार आहे. प्रेमाच्या बाबतीत, झोपेत काही अडचण येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विश्रांती घेणे महत्वाचे असणार आहे. सप्ताहाच्या शेवटी काळ थोडा कठीण असेल आणि मन अस्वस्थ राहेल. या आठवड्यात कामात प्रगती होणार आहे. तुमचा मान-सन्मानही वाढणार आहे. आठवड्याची सुरुवात तुमच्या प्रकल्पाविषयी चांगल्या बातमीने होणार आहे.
कामाच्या ठिकाणी प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती असणार आहे. ज्यामुळे प्रकल्पात सन्मान वाढणार आहे. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल राहणार असून आर्थिक लाभ होणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर प्रेम मजबूत करणारा हा आठवडा आहे. आठवड्याच्या शेवटी काही बातम्यांमुळे तुम्हाला अस्वस्थ करणार आहे.
या आठवड्यात कार्यक्षेत्रात काही अडथळे येणार आहे. प्रेमसंबंधातील प्रश्न संवादातून सोडवावे लागणार आहे. तुम्ही या आव्हानांना तुमच्या युक्तीने तोंड देणार आहात. जीवनातील सुखद अनुभव तुम्हाला येणार आहे. समतोल राखून आणि हुशारीने काम केल्यास चांगले परिणाम तुम्हाला या आठवड्यात दिसणार आहे.
या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध मजबूत होणार आहे. लव्ह लाईफ चांगली असणार आहे. सुरुवातीला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. पैशाच्या बाबतीत स्वतःचे निर्णय घ्या, ते तुमच्यासाठी चांगले राहणार आहे. भागीदारीच्या कामात अडचणी येणार आहेत. आठवड्याच्या शेवटी, बहुतेक गोष्टी ठीक होतील, मात्र काही गोष्टींमुळे तुम्हाला वाईट वाटू शकते. नातेसंबंध अधिक घट्ट होणार आहे. आठवड्याची सुरुवात काही चांगल्या बातमीने होणार आहे.
या आठवड्यात कामात प्रगती पाहिला मिळणार आहे. तुमच्या मेहनतीमुळे प्रकल्प यशस्वी होणार आहे. पैशाच्या दृष्टीने वेळ चांगला जाणार आहे. आर्थिक लाभाचे दाट शक्यता आहे. या आठवड्यात काही चांगली बातमी तुम्हाला प्रसन्न करणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. मन थोडे अस्वस्थ राहिल. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळाल्याने मनःशांती मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि आर्थिक लाभाच्या संधी लाभणार आहे.
या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमची गुंतवणूक बदलू शकाल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रकल्प हळूहळू सुधारतील. तथापि, आठवड्याच्या शेवटी काही मतभेद होऊ शकतात. यामुळे तुमचे काही नुकसानही होऊ शकते. त्यामुळे थोडे सावध राहा. या आठवड्यात पैशाच्या बाबतीत भाग्य तुमची साथ देणार आहे.
या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन मिळेल. तुमचे प्रकल्प हळूहळू यशस्वी होतील. प्रेमसंबंधातील समस्या बोलून दूर होतील. हे चांगले परिणाम देईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्याकडून मदत मिळू शकते. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. तुमचे काम वाढेल. तुम्हाला प्रकल्पांमध्ये यश मिळेल, परंतु तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल. प्रेमाच्या बाबतीत संभाषण आवश्यक आहे. यामुळे संबंध सुधारतील.
हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा हा आठवडा आहे. आर्थिक दृष्ट्या वेळ चांगला आहे, आनंद मिळेल आणि संपत्तीत हळूहळू वाढ होईल. पण प्रेमसंबंधांमध्ये अस्वस्थता आणि मानसिक अस्वस्थता वाढू शकते. नोकरीच्या ठिकाणी भागीदारीशी संबंधित कामात अडचणी येऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळाल्याने तुम्हाला जीवनात समाधान वाटेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच उत्सवाचे वातावरणही राहील. संपत्तीत वाढ मंद पण स्थिर असेल. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)