PHOTOS

Weekly Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांसाठी वेळ चांगला, पैशाची कमतरता राहणार नाही, तुमच्यासाठी कसा आहे हा आठवडा?

Saptahik Ank Jyotish 7 to 13 April 2025 in Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, 7 ते 13 एप्रिल 2025 पर्यंत अनेक योगांचे शुभ जुळून येणार आहेत. त्यानुसार एप्रिलचा हा आठवडा मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी पूर्ण परिश्रमाने यश मिळवण्याचा असेल. 2, 3, 4 आणि 5 मूलांक असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. 6 मूलांक असलेल्या लोकांना कठोर परिश्रमाने यश प्राप्त होणार आहे. मूलांक 7 असलेल्या लोकांसाठी हा काळ चढ-उतारांनी भरलेला असेल. 8 आणि 9 क्रमांकाच्या लोकांना संयमाने काम करावे लागणार आहे. 

Advertisement
1/9
मूलांक 1
मूलांक 1

या आठवड्यात प्रेमसंबंध, करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये बदल घडणार आहे. प्रेम जीवनात प्रेम द्विगुणीत होणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती करण्यासाठी तुम्हाला अहंकार टाळावा लागणार आहे. आर्थिक बाबींमध्ये गुंतवणुकीत समस्या येण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी काळ चांगला राहणार आहे. नवीन विचारांसह पुढे जाण्याने आनंद मिळणार आहे. तुमच्या विवेकाचे ऐकून निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळणार आहे.  प्रेमसंबंधांबद्दल बोलायचे झाले तर, परिस्थिती सुधारणार आहे. 

2/9
मूलांक 2
मूलांक 2

कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे. तुम्ही एखाद्या चांगल्या प्रकल्पात सामील होणार आहात. यामुळे तुमच्या कारकिर्दीत प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. आर्थिक बाबतीतही हा चांगला काळ असणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. या आठवड्यात तुम्ही घर सजवण्यासाठी काही वस्तू खरेदी करणार आहात. किंवा तुम्ही घरात काही बदल किंवा दुरुस्ती देखील करणार आहात. ज्यासाठी तुम्हाला पैसे लागणार आहेत. 

3/9
मूलांक 3
मूलांक 3

या आठवड्यात प्रेमसंबंध मजबूत होणार आहेत. तुम्ही लग्नालाही जाणार आहात. तुम्हाला वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहे. प्रेम जीवन चांगले राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनाचे ऐका आणि निर्णय घेणे योग्य असेल. यामुळे चांगले परिणाम मिळणार आहे. आर्थिक बाबतीत, लोकांशी संपर्क स्थापित करून तुम्हाला यश मिळणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुमचा मूड उदास राहणार असून अस्वस्थता वाढणार आहे. 

4/9
मूलांक 4
मूलांक 4

या आठवड्यात आर्थिक बाबी, प्रेमसंबंध आणि कामाच्या ठिकाणी चढ-उतार पाहिला मिळतील. बाह्य हस्तक्षेपामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये चिंता वाढणार आहे. तर, जीवनात आनंद आणि समृद्धीच्या संधी देखील मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या विचारांवर ठाम राहिल्याने प्रगती होणार आहे. आठवड्याच्या शेवटी केलेल्या प्रवासाचे शुभ परिणाम मिळणार आहे. आठवड्यात आनंद आणि समृद्धीची शक्यता राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा शब्द पाळणे गरजेचे आहे. तुमच्या निर्णयांनुसार कृती करणार आहे. यामुळे जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. 

5/9
मूलांक 5
मूलांक 5

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून या आठवड्यात तुमच्या प्रकल्पातून तुम्हाला आनंद आणि समृद्धीच्या संधी मिळणार आहे. आर्थिक बाबींमध्ये जास्त खर्च होणार आहे. भावनिक कारणांमुळे खर्च जास्त होणार आहे. प्रेम प्रकरणात अचानक घेतलेले निर्णय तुमच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे. या प्रकरणात तुम्ही संयमाने कोणताही निर्णय घेतला तर बरे होणार आहे. या आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता असणार आहे. ती गोष्ट कोणाशीही शेअर करता येणार नाही. 

6/9
मूलांक 6
मूलांक 6

आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. संपत्ती वाढीसाठी शुभ संधी निर्माण होत राहणार आहेत. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील. तुम्हाला कोणत्याही नवीन सुरुवातीबद्दल शंका वाटण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही कोणताही ठोस निर्णय घेणार नाहीत. यामुळे तुमच्यासाठी नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि प्रकल्पात अडथळे येणार आहेत. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेमात अस्वस्थता वाढवेल. तुम्हाला हवे असलेले बदल साध्य करण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी परिस्थितीत सुधारणा होणार आहे. 

7/9
मूलांक 7
मूलांक 7

प्रेम जीवनात परस्पर प्रेम वाढणार आहे. यामुळे प्रेम जीवनात आनंद मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा दिसणार आहे. तुमचे प्रकल्प यशाकडे वाटचाल करणार आहे. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर खर्च वाढणार आहे. आर्थिक बाबतीत, खर्चाच्या परिस्थिती वाढ होणार आहे. अहंकाराच्या संघर्षामुळे खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. याचा अर्थ अहंकारामुळे तुमचे खर्च देखील वाढणार आहे. 

8/9
मूलांक 8
मूलांक 8

प्रेमसंबंधांमध्ये वेळ अनुकूल असणार असून हळूहळू नाते गोड होणार आहे. कामाच्या ठिकाणीही, प्रकल्प हळूहळू प्रगतीच्या मार्गावर पुढे जाणार आहे. तुम्हाला जीवनात शांती प्राप्त होणार आहे. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहणार असून जर तुम्ही आत्मविश्वासाने गुंतवणूक केली तर तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. या आठवड्याच्या शेवटी, तुमच्या आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीमधील अंतर वाढणार आहे. तुमचे मन अस्वस्थ राहणार आहे. 

9/9
मूलांक 9
मूलांक 9

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून आदरही वाढणार आहे. या आठवड्यात शुभ परिणाम मिळत आहेत आणि फायदेशीर परिस्थिती निर्माण होणार आहे. आर्थिक बाबतीतही, या आठवड्यात तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ परिस्थिती येणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्यासाठी जे काही कठोर परिश्रम केले आहेत ते येत्या आठवड्यात शुभ परिणाम देणार आहेत. आठवड्याच्या शेवटी जीवनात शांती राहणार आहे. तुम्हाला काही सकारात्मक बातम्या कानावर पडणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Read More