PHOTOS

ऐकावं ते अजब ! 'या' देशात लोक लग्नासाठी दुसऱ्याची बायको पळवतात, शिक्षाही नसते...

Weird Marriage Rituals : आपल्याकडे विवाह करताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. आजही मुलगी - मुलगा दाखविण्याचा कार्यक्रम केला जातो. तसेच प्रेम विवाह होत असतात. काही जण आधी रिव्ह इन रिलेनशिपमध्ये असतात. नंतर ते लग्न बंधनात अडकतात. मात्र, जगात असा एक देश आहे की, चक्क दुसऱ्याची बायको पळवून लग्न केले जाते. या देशात तशी प्रथा असल्याचे सांगितले जाते. मात्र, जरी दुसऱ्याची बायको पळवली तरी येथे शिक्षा केली जात नाही.

Advertisement
1/5

 लग्नासंदर्भात जगभरात विविध विधी आणि प्रथा आहेत. भारतात, प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या समुदायांमध्ये लग्नाबाबत वेगवेगळ्या परंपरा आहेत. लग्नासाठी दुसऱ्याची बायको पळविण्याची प्रथा पश्चिम आफ्रिकेत वोडाबे जमातमध्ये प्रथा आहे. इथे लग्न करण्यापूर्वी पुरुषांना दुसऱ्या पुरुषाची बायको चोरावी लागते. अशा प्रकारे विवाह करणे ही या जमातीची ओळख आहे. दुसऱ्याची बायको चोरल्यानंतर आणि नंतर लग्न केल्यानंतर यासाठी त्यांना ना दंड, ना शिक्षा असते.

2/5

आफ्रिकेत अशी एक जमात आहे, जिथे लोकांना लग्न करण्यासाठी दुसऱ्याच्या बायका चोराव्या लागतात. गेरेवोल लोक आजही या प्रथेचे पालन करत आहेत. त्यामुळे दरवर्षी गेरेवोल महोत्सवाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये मुलं कपडे घालून चेहऱ्यावर रंग लावतात. यानंतर ते नृत्य आणि इतर अनेक माध्यमांनी दुसऱ्यांच्या बायकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो.

3/5

रिपोर्ट्सनुसार, या जमातीमध्ये पहिला विवाह कुटुंबीयांच्या संमतीने केला जातो. पण दुसऱ्या लग्नाबाबतच्या प्रथेमध्ये थोडा ट्विस्ट आहे. एखाद्याला दुसरे लग्न करायचे असेल तर त्याला दुसऱ्याची बायको चोरावी लागते. जर तो हे करु शकत नसेल तर त्याला पुन्हा लग्न करण्याचा अधिकार मिळत नाही.

4/5

वोडाबे जमातमध्ये या प्रथेचे पालन करत आहेत. गेरेवोल महोत्सवात पुरुषांच्या सौंदर्याची परीक्षा घेणार्‍या महिला न्यायाधीश असतात. जो पुरुष सर्वात आकर्षक असतो, महिला न्यायाधीश तिला हवे असल्यास त्याच्याशी लग्न करु शकतात. जरी महिला न्यायाधीश आधीच विवाहित असेल तरी सुद्धा लग्न करु शकतात.

5/5

मात्र, यासाठी त्या महिलेच्या पतीला याची माहिती नसली पाहिजे, याची काळजी त्यांना घ्यावी लागते. एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होऊन विवाहित स्त्री घरातून पळून गेली तर समाजातील लोक तिला शोधून काढतात आणि नंतर तिचे लग्न लावून दिले जाते. यानंतर दोघांचा विवाह प्रेमविवाह म्हणून स्वीकारला जातो.





Read More