विवाहित पुरुष हे अनेकदा त्यांच्या पत्नीऐवजी इतर पुरुषांच्या पत्नीकडे का आकर्षित होतात? जाणून घ्या सविस्तर
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात विवाहित पुरुष हे त्यांच्या पत्नीऐवजी दुसऱ्यांच्या पत्नीकडे का आकर्षित होतात याबद्दल सांगितलं आहे.
चाणक्य यांनी विवाहित पुरुष आपल्या पत्नीपासून दूर का जाऊ लागतो यामागची पाच कारणे सांगितली आहेत. कोणती आहेत ती कारणे जाणून घ्या.
कमी वयात लग्न करणाऱ्या मुलांना या गोष्टींचा सामना करावा लागतो. कारण ते मानसिकदृष्ट्या तयार नसतात. करिअर, महत्त्वाकांक्षा आणि नवीन जगाची इच्छा त्यांना हळूहळू बदलू लागते. त्यामुळे त्यांचे बाह्या आकर्षण वाढते.
अनेकदा पती-पत्नीमधील शारीरिक किंवा भावनिक संबंध कमकुवत होतात. तसेच लाज किंवा संकोचामुळे देखील दोघांमध्ये अंतर बनते.
त्याचबरोबर मुलाच्या जन्मानंतर पत्नीच्या प्राधान्यक्रमात बदल होणे स्वाभाविक आहे. यामुळे पतीला दुर्लक्षित वाटू लागते.
माणसाचे मन चंचल असते त्यामुळे तो कुठेतरी नवीन रोमांचक आणि आकर्षक वाटले अशा गोष्टीकडे नेहमी वळत असते. हे आकर्षण तात्पुरते असते.
चाणक्यांच्या मते, जेव्हा पुरुषाचे माणसाला नियंत्रण राहत नाही तेव्हा तो चुकीच्या वातावरणात राहत असतो तेव्हा तो इतर नात्यांकडे धावू लागतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)