PHOTOS

शंभूराजेंच्या निधनानंतर स्वराज्याच्या राजकन्या भवानीबाईंचे काय झाले?

स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा छावा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. छावा सिनेमानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत.

Advertisement
1/7
शंभूराजेंच्या निधनानंतर स्वराज्याच्या राजकन्या भवानीबाईंचे काय झाले?
शंभूराजेंच्या निधनानंतर स्वराज्याच्या राजकन्या भवानीबाईंचे काय झाले?

छावा सिनेमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनगाथा दाखवण्यात आली आहे. संभाजी महाराज, महाराणी येसूबाई यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यावेळी सध्या चर्चा होत आहे ती म्हणजे संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई यांची. 

2/7

छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याच्या राजकन्या भवानी बाई यांचे काय झाले हे अजूनही महाराष्ट्रातील जनतेला माहिती नाही. याच प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया.

3/7

भवानीबाई यांचा जन्म 4 सप्टेंबर 1678 साली श्रृंगारपूर पिलाजी राजेशिर्के यांच्या वाड्यात झाला होता. 

4/7

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई आपल्या मातोश्री महाराणी येसूबाई आणि धाकटे बंधू शाहू महाराजांसोबत औरंगजेबाच्या कैदेत होत्या. 

5/7

भवानीबाई यांचा विवाह महाडिक कुटुंबात हरजीराजे महाडिक आणि अंबिकाबाई यांचा पुत्र शंकराजी महाडिक यांच्याशी झाला

6/7

शंकराजी महाडिक यांनी जिंजीचा किल्ला स्वराज्यात राहावा म्हणून मोठे प्रयत्न केले होते. शाहू महाराजांनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद व महाडिकांना मोठी मान्यता दिली होती. 

7/7

भवानी बाई यांना दुर्गोजी आणि अंबाजी हे दोन पुत्र होते. शंकराजींच्या मृत्यूनंतर भवानीबाई सती गेल्या होत्या. तारळे गावातील तारळे आणि काळगंगा या नद्यांच्या संगमावरती भवानीबाईंची समाधी आहे. भवानीबाई यांचा ऐतिहासिक वाडा अद्यापही पाटण तालुक्यात असलेल्या तारळे गावात आहे. 

 





Read More