images: मुंबईत होणाऱ्या बर्फवृष्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेषत: उन्हाळ्यात मुंबईकरांना उकाड्याने आणि...
डोंगरावरुन जाणारे रस्ते,निसर्ग सौंदर्य आणि मुख्य म्हणजे बर्फाचा हिमालय पर्वत, यामुळे काश्मीरला भारताचं नंदनवन म्हणतात.
काश्मीरमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीबद्दल भारताच्या इतर राज्यातील लोकांना कायमच आकर्षण असतं.
विशेषत: उन्हाळ्यात मुंबईकरांना उकाड्याने आणि प्रदुषणाने जीव नकोसा होतो. पण याच मुंबईत जर बर्फ पडला तर ?
ट्रॅफिकमुळे आणि लोकलच्या गर्दीत गजबजलेल्या मुंबईत जर बर्फ पडला तर, ही मुंबई कशी दिसेल याचे AI एआय जनरेटेड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सध्या एआय फोटोंचा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटींपासून ते नेटकऱ्यांपर्यंत एआय फोटोंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळते.
अशातच आता मुंबईचे एआय जनरेटेड फोटोंना सध्या पसंती मिळत आहे. या एआय जनरेटेड फोटोंमध्ये मुंबईतील काही ठिकणी बर्फ पडताना दाखवण्यात आले आहेत.
मुंबई महानगरपालिका, मार्केटमधले रस्ते आणि मुंबईची लोकल यावर बर्फवृष्टी झाल्यावर मुंबईच्या एआय जनरेटेड फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली.